जूनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
महिला सक्षमीकरण, शिक्षण व स्वावलंबनाचा संदेश
जूनगाव, दि. ८ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त जि. प. उच्च प्राथमिक शाळा, जूनगाव येथे महिला सक्षमीकरणाचा संदेश देणारा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. हरीचंद्रजी पाल होते. प्रमुख अतिथी म्हणून बचत गट समन्वयक सौ. आशाताई झाडे, उज्वल ग्राम संघाच्या सचिव व समन्वयक सौ. शीलाताई झबाडे, सौ. अश्विनीताई आउतकर, सौ. मधुरिताई घोगरे, सौ. चंद्रकलाताई पोरटे, सौ. मनिषाताई ठाकूर यांची उपस्थिती लाभली. तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सौ. मनीषा हर्षे मॅडम यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी सौ. आशाताई झाडे, सौ. शीलाताई झबाडे आणि सौ. अश्विनीताई आउतकर यांनी महिलांना स्वावलंबन, बचत गटांचे महत्त्व आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी महिलांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज याबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात सौ. वंदनाताई मेश्राम यांनी ‘नारी शक्ती’ला समर्पित गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सौ. शीलाताई झबाडे यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांनी समाजविकासात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री. संतोष सिडम सर यांनी मार्गदर्शन करत महिलांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि स्वाभिमानाच्या जोरावर समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. आकाश कुकुडकर सर व श्री. तेजराम लंजे सर यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी कु. रिया बंडू चिंचोलकर हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
ठळक मुद्दे :
- जागतिक महिला दिनानिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम
- महिला सक्षमीकरण व स्वावलंबनावर मार्गदर्शन
- ‘नारी शक्ती’ला समर्पित गीत सादरीकरण
- ग्रामस्थ व महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती
- शिक्षण व आत्मनिर्भरतेचा संदेश
















0 टिप्पण्या
Thanks for reading