📰 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क |
मूल येथे काँग्रेसचा पुन्हा दबदबा; आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीची निवडणूक अविरोध
मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये महत्त्वाची भर पडत आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटी, मूल येथील संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अविरोध पार पडली आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे वर्चस्व सिद्ध झाले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदेश काँग्रेसचे महासचिव तथा स्थानिक नेतृत्वाचे मार्गदर्शक संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडली. सर्व संचालक बिनविरोध निवडून आल्याने संघटनात्मक एकजूट आणि पक्षाची ताकद पुन्हा अधोरेखित झाली आहे.
दरम्यान, संस्थेच्या सभापती व उपसभापती पदाची निवड गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी होणार आहे. यासाठी सकाळी १० वाजता काँग्रेस भवन, मूल येथे संतोषसिंह रावत यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीसाठी आदर्श खरेदी विक्री सहकारी सोसायटीचे सर्व नवनिर्वाचित संचालक, तालुका व शहर काँग्रेस पदाधिकारी, युवक व महिला काँग्रेसचे प्रतिनिधी, नगर परिषद पदाधिकारी, नगरसेवक तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या निवडणुकीमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात काँग्रेसची पकड अधिक मजबूत होणार असल्याचे बोलले जात आहे.
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading