Advertisement

पोंभूर्णा येथे खरीप हंगामपूर्व कृषी नियोजन बैठक संपन्न शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खत व कीडनाशकांबाबत मार्गदर्शन

पोंभूर्णा येथे खरीप हंगामपूर्व कृषी नियोजन बैठक संपन्न

शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, खत व कीडनाशकांबाबत मार्गदर्शन

पोंभूर्णा प्रतिनिधी :
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पोंभूर्णा यांच्या वतीने खरीप हंगाम २०२६ पूर्व नियोजन बैठक व कृषी सेवा केंद्र चालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी साहित्य उपलब्ध करून देणे, बनावट बियाणे व खत विक्रीवर नियंत्रण ठेवणे आणि खरीप हंगाम सुरळीत पार पाडणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका कृषी अधिकारी एस. एम. डोबळे यांनी भूषविले. यावेळी कृषी अधिकारी (गुण नियंत्रण) गणेश गवळी, उपकृषी अधिकारी एस. जी. कोसरे, व्ही. डी. भाले यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी व कृषी केंद्र चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत कृषी निविष्ठा विक्रेत्यांना परवाना नूतनीकरण, ई-पॉस मशीनचा वापर, दर्शनी फलक अद्ययावत ठेवणे तसेच शासन नियमांचे काटेकोर पालन करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, रासायनिक खते व कीडनाशके उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी शासनाच्या नव्या निर्देशांनुसार सन २०२५-२६ पासून ‘साथी’ पोर्टलवरूनच बियाण्यांची विक्री करण्याची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. तसेच युरिया टॉप-२० विक्री, खत साठा व्यवस्थापन आणि खरीप हंगामातील संभाव्य अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एम. डोबळे यांनी केले. सूत्रसंचालन एस. जी. कोसरे यांनी तर आभार प्रदर्शन व्ही. डी. मानकर यांनी केले. कार्यक्रमाला तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक, संचालक व शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#VaingangaNewsLiveNetwork #Pombhurna #AgricultureNews #KharifSeason #Farmers #AgricultureDepartment #KrishiVibhag #MaharashtraNews #मराठीबातम्या #शेतकरी #खरीपहंगाम #कृषीविभाग #पोंभूर्णा #वैनगंगान्यूज

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या