Advertisement

घोसरी फाट्यावर पाणपोईची उभारणी; नागरिकांकडून समाधान व्यक्त परिसरात सुविधा उभारण्याची नागरिकांची मागणी पूर्ण

 

घोसरी फाट्यावर पाणपोईची उभारणी; नागरिकांकडून समाधान व्यक्त

परिसरात सुविधा उभारण्याची नागरिकांची मागणी पूर्ण

मुल तालुका प्रतिनिधी | वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क

मुल तालुक्यातील नांदगाव ही मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात असून परिसरातील डझनभर गावांतील नागरिक विविध कामानिमित्त येथे दररोज ये-जा करतात. गावात शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, व्यापारी आस्थापने तसेच शैक्षणिक सुविधा असल्याने दिवसभर मोठी वर्दळ असते. मात्र बसस्थानक व घोसरी फाटा परिसरात पिण्याच्या शुद्ध पाण्याची सुविधा नसल्याने नागरिकांना विशेषतः उन्हाळ्यात मोठा त्रास सहन करावा लागत होता. नांदगावातील लोकांनी नाही परंतु भोसरी फाट्यावर जून गावच्या दाम्पत्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली.

उन्हाची तीव्रता वाढत असताना प्रवासी, शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना उन्हात तासन्‌तास थांबावे लागत असल्याने कायमस्वरूपी पाणपोई उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत होती.

या बातमीची दखल घेत भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष तसेच जुनगावचे सरपंच श्री. राहुल भाऊ पाल यांनी आणि अश्विनीताई राहुल भाऊ पाल यांनी आमदार Sudhir Mungantiwar यांच्या सूचनेनुसार घोसरी फाटा परिसरात पाणपोईची उभारणी केली आहे.

विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा किंवा उद्घाटन सोहळा न करता या दांपत्याने नागरिकांच्या सुविधेसाठी पुढाकार घेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रवासी व स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत असून राहुल भाऊ पाल व अश्विनीताई पाल यांचे आभार मानले जात आहेत.

स्थानिक नागरिकांनी प्रशासन, सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे सार्वजनिक सुविधांसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या