चंद्रपूर नगरी -
एसबीसी अन्याय निवारण कृती समितीच्या 'मुंबई संपर्क प्रमुख' पदी श्री प्रदिप भोगावार यांची नियुक्ती
चंद्रपूर : एसबीसी प्रवर्गाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर लढा देणाऱ्या एसबीसी अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष श्री सुरेश पद्मशाली यांनी दिनांक २३/१०/२०२६ रोजीच्या नियुक्ती पत्राद्वारे श्री प्रदिप भोगावार, मुंबई यांची संघटनेच्या 'मुंबई संपर्क प्रमुख' पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्ती पत्रात नमूद करण्यात आले आहे की, श्री भोगावार यांनी मुंबई जिल्ह्यातील कार्यकारिणीची लवकरात लवकर नियुक्ती करून संघटनेचे कार्य अधिक गतिमान करावे.
सदर नियुक्तीबद्दल संघटनेच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात एसबीसी समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटन अधिक मजबूत होणार असून, चंद्रपूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.
एसबीसी अन्याय निवारण कृती समितीच्या कार्यात मुंबई हा महत्त्वाचा संपर्क केंद्र बिंदू आहे. श्री प्रदिप भोगावार यांच्या अनुभवाचा आणि संपर्काचा संघटनेला निश्चितच मोठा फायदा होईल, असा विश्वास अध्यक्ष सुरेश पद्मशाली यांनी व्यक्त केला आहे.
- चंद्रपूर नगरी प्रतिनिधी
---
एसबीसी अन्याय निवारण कृती समिती, महाराष्ट्र (मुख्य कार्यालय - पत्रकार भवन, टिळक रोड, पुणे) चे अध्यक्ष मा. सुरेश पद्मशाली यांनी श्री प्रदिप भोगावार यांची मुंबई संपर्क प्रमुख पदी निवड केली. त्यांनी मुंबई जिल्हा कार्यकारिणी गठीत करून समाजाच्या न्याय हक्कासाठी काम करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




0 टिप्पण्या
Thanks for reading