पोस्ट्स

बामनवाडा येथे शुल्लक कारणावरून महादेव कोडापे यांची भोकसून हत्या

इमेज
प्रतिनिधी: संतोष कुळमेथे राजुरा शहरालाच लागून असलेल्या गावात आज सकाळी पहाटे 9.30 वा शुल्लक वादातून महादेव कोडापे यांना  गावातील युवकाने सुरीने भोकसुन जखमी केले. त्यांना जिल्हा उपरुग्णालय येथे गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले. घाव गंभीर असल्याने त्याला उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून त्यांला चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले . चंद्रपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.       बामणवाडा येथे वादाच्या घटना नेहमी घडत असून त्याला कारण गावात मिळणारी अवैध दारू ,गावात जुगार व दारू बंद करावी अशी मागणी   नागरिकांकडून केली जात आहे. ह्याच मार्गाने अनेक अवैध धंदे सुरू असल्याने गावात पोलिस चौकी देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सावधान! माइल्‍ड हार्ट अटॅक? 🔹ताबडतोब डॉक्टरांकडे जा नाहीतर जीव येऊ शकतो धोक्यात!

इमेज
🔹हवामान थंड होताच हृदयविकाराचा धोका खूप वाढतो.  🔹हृदयरोग तज्ञ डॉ. अनिल रुडे यांचा जनहितार्थ सल्ला.  नागपूर / प्रतिनिधी दि. 11/12/2022:- हृदयविकाराचा झटका टाळायचा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टीं व्यतिरिक्त त्याची काही लक्षणेही जाणून घेणे आवश्यक आहे. ज्यामुळे वेळीच स्वत:सोबत इतरांचा जीव वाचविण्यासाठी मदत होते.    माइल्‍ड हार्ट अटॅकची लक्षणं, ताबडतोब डॉक्टरांकडे जा नाहीतर जीव धोक्यात येऊ शकतो .  हृदयविकाराच्या झटक्याने दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. अशा परिस्थितीत टीव्ही आणि सिनेमाच्या माध्यमातून हृदयविकाराची लक्षणे माहीत होतात.यामध्ये छातीत दुखणे, अस्वस्थ वाटणं आणि घाम येणं यांचा समावेश होतो. पण याशिवाय हृदयविकाराची अशीही काही लक्षणे आहेत ज्यांची माहिती फार कमी लोकांना आहे. ही लक्षणे गांभीर्याने न घेतल्यास जीव देखील जाऊ शकतो. म्हणूनच मायनर हार्ट अटॅकच्या काही न ऐकलेल्या लक्षणांबद्दल माहिती देणे महत्त्वाचे वाटते. त्यांच्याबद्दल जाणून घेतल्यास स्वत:चाच नाही तर घरातील इतर अनेक व्यक्तींचा जीव वाचविण्यासाठी मदत होते.  हृदयविकाराचा झटका ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाला ...

सुंदर नगर वार्डाच्या विकासासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

इमेज
राहुल श्रीराम भोयर ब्रम्हपुरी    ब्रम्हपुरी:- सुंदर नगर येतील युवक श्री.अमित रोकडे यांनी महाराष्ट्र राज्याचे वन, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना सुंदर नगर वार्डाच्या विकासासाठी साकडे घातले व अनेक विकास कामांसाठी मागणी केली. ब्रम्हपुरी शहरातील सुंदर नगर परिसर हा गेल्या 25 वर्षा पासून रस्ते,पाणी,नाल्या ह्या सुविधा पासून येथील नागरिक वंचित आहे . मुख्यतो कामगार वर्गाचा अश्राय स्थान आहे. लगतच्या जिल्ह्यातील अनेक परिवार रोजगाराच्या शोधात ब्रम्हपुरीतील सुंदर नगर येते स्थायिक झाले. मात्र गेल्या अनेक वर्षापासून हा भाग पिण्याचे पाणी,रस्ते, नाल्या या सारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेला आहे.आवश्यकते नुसार विकास कामे झालेली नाहीत. नावात सुंदर असला तरी सर्वत्र अस्वच्छता आहे. यामुळे रोगराई,सर्प दंश इ. यांची सतत भीती असते.पिण्याच्या पाण्यासाठी घरा घरात पाइप लाईन नाही. रस्त्यांची दुर्दशा आहे.पावसाळ्यात तर कपडे घान झाल्याशिवाय बाहेर कामाला जाता येत नाहीत. सदर अडचणींवर प्रकाश टाकत सुंदर नगर येतील नागरिकांच्या या मोठ्या अडचणी कडे पा...

• सरपंच संसद च्या नागपुर विभाग समन्वयकपदी संजय गजपुरे यांची नियुक्ती

इमेज
  • केंद्रीय आरोग्य व महिला बालकल्याण राज्यमंत्री डॅा. भारतीताई पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान अरुण रामुजी भोले नागभिड तालुका प्रतिनिधी नागभिड --- पुणे येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठात पार पडलेल्या राष्ट्रीय सरपंच संसदेच्या दोन दिवसीय अधिवेशनात नागपुर विभाग समन्वयकपदी चंद्रपुर जिल्ह्यातील संजय होमराज गजपुरे यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली .            संजय गजपुरे हे चंद्रपुर जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे युवा नेतृत्व असुन त्यांच्यातील संघटन कौशल्य व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे राष्ट्रीय सरपंच संसदेच्या नागपुर विभागीय समन्वयक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुर्वी ते चंद्रपुर जिल्हा समन्वयक म्हणुन काम पाहत होते. या माध्यमातुन शासनाच्या नाविण्यपुर्ण व लोकोपयोगी विविध योजना ग्रामवासीयांपर्यंत पोहचविण्याचा निर्धार संजय गजपुरे यांनी व्यक्त केला आहे.                राष्ट्रीय सरपंच संसदेच्या पुणे येथे संपन्न दोन दिवसीय अधिवेशनात एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष राहुल कराड व राष्ट्रीय सरपंच संसदेचे मुख्य समन्वयक योगेश पाटील या...

घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

इमेज
हे अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे कोणत्या ठिकाणी अर्ज करावा लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. पारंपरिक सौर ऊर्जा स्रोत वीज पोचणार नाही अशी गावे, घरावरील सोलारसाठी 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील सुरू झाले आहे. विजेची कमतरता दूर व्हावी म्हणून शासनाच्या अंतर्गत घरावर सौर ऊर्जा पेनल बसवण्यात येते यामुळे विजेची बचत देखील होते. मोफत निर्धूर चूल योजना अर्ज सुरु 2022 असा करा ऑनलाईन अर्ज Solar Panel Yojana घरावरील सोलारसाठी मिळणार 100 टक्के अनुदान राज्यामध्ये विजेची मागणी लक्षात घेऊन शासनाने घरावरील सोलार या योजनेला सुरुवात केली आहे या योजनेच्या अंतर्गत 100 टक्के अनुदान दिले जाणार आहे. सौर पेनलसाठी 100 टक्के अनुदान देण्याचा 2021 चा शासन निर्णय आहे त्यामुळे तुम्ही देखील या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या घरावर सोलार बसवायचे असेल व स्वखर्चाने असले तर तुम्हाला खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी तुम्ही या योजनेच्या माध्यमातून देखील सोलरचा लाभ घेऊ शकतात. घरासाठी सोलर पॅनल बसविले तर वीज बिलामध्ये मोठी बचत तर होईल. असा करा ऑनल...

बोगस आदिवासींना संरक्षण देणाऱ्या सरकार च्या विरोधात राजुरात धरणे आंदोलन

इमेज
संतोष कुळमेथे राजुरा तालुका प्रतिनिधी        मूळ अनु जमातीच्या जागांवर नौकरीत असलेल्या बोगस आदिवासींना संरक्षण देऊन त्यांना सेवेत कायम ठेवण्याचा निर्णय 29 नोव्हेंबर 2022 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री ह्यांनी घेऊन सर्वोच्च न्यायालयचा अवमान तसेच आदिवासी समाजावर अन्याय कारक निर्णय घेण्यात आला त्याचे आज चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा ह्या तालुक्यात पळसाद धरणे आंदोलनाच्यां रुपात बघायला मिळाले.शेकडो आदिवासी बांधव धरणे आंदोलनात सहभागी होऊन समर्थन करीत राज्य सरकार चा निषेध करण्यात आला.       राज्य सरकार हे नेहमी आदिवासी समाजाच्या विकासाच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेण्यात अग्रेसर आहे असे दिसून येत आहे.मग तो निर्णय डीबीटी चां असो, अनू जमाती पी.हच.डी. फेलोशिप, पाच वर्षे खंड असलेल्या मुलांना शिष्यवृत्ती योजना बंद करण्याच्या निर्णय असो असे अनेक चुकीचे निर्णय घेण्याची भूमिका ह्या काही काळात घेण्यात आली. एकीकडे आदिवाशी समाजाला मुख्य प्रवाहात आणून त्याचा विकास करण्याचा ढोंग करून दुसरी कडे समाजाच्या योजना बंद करून त्यांनां रोकले जात आहे असे मत बिरसा क्रांती दलाचे नेते संतोष कूळमेथे ह्यांनी बोलून दाखवले. ...

रानटी डुकराच्या हल्ल्यातून बचावलेल्या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पिकाची डुकरांनी केली नासाडी

इमेज
विजय जाधव मुल तालुका प्रतिनिधी                 ‌‌ विजय जाधव, मुल तालुका प्रतिनिधी. .                                     पोभूर्णा तालुक्यात अनेक गावात वाघाची दहशत असून ग्रामस्थ भयभयीत झाले आहेत. असे असताना रानटी डुकरांनीही उभ्या पिकांमध्ये हैदोस घातलेला आहे. वन विभागाला अर्ज, विनंती करूनही वन विभाग जंगलात ड्युटी असल्याचे कारणे दाखवून शेतकऱ्यांच्या अर्ज, विनंती व मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. रानटी डुकरांमुळे अनेक शेतकऱ्यांची नुकसान झाली असून मौजा नांदगाव येथे गेल्या ऑगस्ट महिन्यात झालेल्या रानटी डुकराच्या हल्ल्यातून बचावलेल्या नीलकंठ मारुती नरसपुरे वय ६० वर्ष या शेतकऱ्याची उन्हाळी सोयाबीन पीक गेल्या दोन दिवसापासून नास धूस करीत असल्याने नीलकंठ नरसपुरे यांची प्रचंड आर्थिक नुकसान झालेली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष शेतात जाऊन उन्हाळी सोयाबीन व तुरीच्या पिकाची प्रत्यक्ष पाहणे केली असता हे वास्तव समोर आले. याबाबतची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली असता त्यांनीही प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यापूर्वी पावसाळी सो...