पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शालेय मित्रांचा स्नेहमिलन मैत्री सोहळा ,तब्बल 32 वर्षानंतर शालेय मित्र भेटले- पोंभुर्णा च्या इतिहासातील प्रथमच उपक्रम 👉

इमेज
शालेय मित्रांचा स्नेहमिलन मैत्री सोहळा ,तब्बल 32 वर्षानंतर शालेय मित्र भेटले- पोंभुर्णा च्या इतिहासातील प्रथमच उपक्रम 👉 पोंभुर्णा: येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पहिला वर्ग ते चौथा वर्गात शिकलेले तथा जनता विद्यालयात पाचवी ते दहाव्या वर्गापर्यंत शिकलेल्या शालेय विध्यार्थाँन्चा स्नेहमिलन सोहळा पोम्भुर्णा येथील वनविभागाचे विश्रामगृहात 27 & 28 जानेवारी ला संपन्न झाला. ग्रुप ऐडमिन श्री संतोष भंडारवार यांनी सर्व माजी विध्यार्थाँन्चा कोन कुठे आहे याचा शोध घेतला .स्वता मेहनत घेऊन व शोशलमिडीयाचे माध्यमातून प्रयत्न करुन सर्व जिल्हा परिषद मराठी शाळा ते जनता विध्यालय पोम्भुर्णा येथे शिकलेल्या सर्व मित्रांचे मोबाईल नंबर मिळविले. सर्वांशी सम्पर्क केला व ग्रुप तयार करुन सर्वांना एकत्र आणले.   दिनांक 27 व 28 जानेवारी या दोन दिवसीय स्नेहमिलन मैत्री सोहळ्याचे आयोज्ंन करुन 1982 ते 1992 या काळात वर्ग 1 ला ते वर्ग 10 वीत शिकलेल्या 30 मित्र व 15 मैत्रिणी अश्या एकुण 45 शालेय मित्रांना तब्बल 32 वर्षांनंतर एकत्र आनले व शालेय जीवनातील आठवणींना ऊजाळा दिला.  ,पोम्भुर्णा तालुक्यातील इतिहासातला शालेय विध्या...

निधन वार्ता-जुनगाव येथील गणपती झबाडे यांचे निधन

इमेज
पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील माजी घाटकरी, सर्वांशी मनमिळाऊ स्वभावाचे धनी, गणपतीची झबाडे यांचे आज दिनांक 30 जानेवारी 2024 रोजी दुपारच्या सुमारास त्यांचे राहते घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचे पश्चात पत्नी, ४ मुली, जावई, दोन बहिणी, नातवंडे असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी अकरा वाजता त्यांचे राहते घरून निघणार असून वैनगंगा नदीच्या तीरावरील मोक्षदामावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी, मित्रमंडळींनी अंत्यदर्शनासाठी उपस्थित राहावे असे आवाहन  त्यांचा नातू, महेश गोंधळी यांनी केले आहे.

सुशी येथील आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू! शाळेसमोर पोलिसांचा फौज फाटा तैनात

इमेज
आत्ताची ब्रेकिंग चंद्रपूर: संध्याताई गुरुनुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर, यांच्या जिजामाता प्राथमिक आश्रम शाळा सुशी येथील विद्यार्थिनी चा अचानक मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. शाळेत मुलीची डेड बॉडी नसतानाही शाळेच्या समोर पोलिसांचा फौज फाटा तैनात आहे. मृत्यूचे गुढ वाढले असून प्रकरण राजकीय वळण घेण्याची शक्यता आहे... विद्यार्थिनीचा मृत्यू कसा झाला हे उघड होणे गरजेचे आहे. तसेच शाळेवर कारवाई होणे गरजेचे आहे.... मूल तालुक्यातील सुशी येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक 29 जानेवारी ला घडली. कु. मित्तल केशव कोंडागुर्ले वर्ग सहावा राहणार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील मरपल्ली असे मृतक विद्यार्थिनीचे नाव आहे. सुशी दाबगाव येथील जिजामाता प्राथमिक आश्रम शाळेत विद्यार्थी निवासी राहतात. 31 जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रमाकरिता नृत्याचे सराव सुरू होता यात मित्तल कोंडागलें ही सराव करीत असताना चक्कर आली. तिला छातीत दुखत असल्याने शाळेचे चपराशी सोंडूले यांनी मूल उपजिल्हा रूग्णालयात नेले. डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात रेफर केले...

नांदगावात मुरूम चोरांचा धुमाकूळ! चोर तो चोर वर शिरजोर# ट्रॅक्टर मालक चालकांनी अक्षरशा उडवला धुराळा-संबंधितांनी लक्ष देण्याची गरज

इमेज
नांदगावात मुरूम चोरांचा धुमाकूळ! चोर तो चोर वर शिरजोर ट्रॅक्टर मालक चालकांनी अक्षरशा उडवला धुराळा-संबंधितांनी लक्ष देण्याची गरज चंद्रपूर: मुल तालुक्यातील नांदगाव आणि पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी,फुटाणा व परिसरात ट्रॅक्टर मालकांनी मुरूम चोरीचा सपाटा चालविला आहे. त्यांच्या या चोरीच्या गोरख धंद्यामुळे वाहतूक समस्या निर्माण झाली असून रस्त्यांची ऐशी तैशी होत आहे. ट्रॅक्टरच्या भरधाव वेगामुळे नागरिक आणि विद्यार्थी यांना अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. ट्रॅक्टरच्या भरभक्कम आवाजाने नागरिकांची झोप उडाली आहे. नांदगाव, घोसरी, लाल हेटी, फुटाणा,गोवर्धन व परिसरातील ट्रॅक्टर धारकांनी जणू धुमाकूळ माजवलेला आहे. परिसरात गोसे खुर्द धरणाच्या कालव्याचे काम सुरू असून या खोदकामातून निघालेले मुरूम ट्रॅक्टर मध्ये भरून अनेक ट्रॅक्टर मालक (चोरून) इतरांना विकत आहेत. या बाबीकडे प्रशासन दुर्लक्ष का करते?सर्व ट्रॅक्टर वर कारवाई का होत नाही.  या धंद्यातील बहुतेक ट्रॅक्टर शेती कामासाठी म्हणून विकत घेतलेल्या आहेत मात्र शेतीकाम व्यतिरिक्त ते अवैध मार्गाने व्यवसाय करत आहेत यावरही संबंधित विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. ट्र...

उंदरुजी पाल यांचे आकस्मिक निधन, कुटुंब शोक सागरात

इमेज
उंदरुजी पाल यांचे आकस्मिक निधन, कुटुंब शोक सागरात जुनगाव! (अजित गेडाम) पोंभुर्णा तालुक्यातील जूनगाव येथील उंदरुजी डोमा जी पाल उर्फ (बोवा) यांचे आज सकाळच्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 65 वर्ष होते. त्यांची बीपी अचानक वाढली आणि त्यांना डोक्यात त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांची नस फाटली, दवाखान्यात नेत असताना त्यांची वाटेतच प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी, जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे.

*विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समिती आर्वी कार्यकारणी सर्वानुमते व सर्वसंमतीने गठीत*

इमेज
*विश्वभूषण भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती महोत्सव समिती आर्वी कार्यकारणी सर्वानुमते व सर्वसंमतीने गठीत* अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा  मो 8956647004 आर्वी!* कार्यकारणीच्या अध्यक्षपदी सुजित भिवगडे कोषाध्यक्ष पंकज भिमके तर महासचिवपदी धम्म प्रचारक सुरेश भिवगडे यांची निवड* *तरूणाईकडे समितीची सुत्रे* *जयंती समितीच्या माध्यमातून आर्वी शहरात नियोजनबद्ध व समाज प्रबोधनपर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याकरिता युवा वर्गाचा पुढाकार*  *स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर येथील* *बुद्ध विहारात एका सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले होते* *या सभेच्या अध्यक्षस्थानी सुजीत भिवगडे होते* *या सभेत पूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली* *तसेच येणाऱ्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे नियोजन कसे करावे यावर चर्चा करण्यात आली* या सभेत निवडण्यात आलेली डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती आर्वी पुढील प्रमाणे अध्यक्ष :- सुजित भिवगडे उपाध्यक्ष :- अमोल दहाट                  गौतम कुंभारे महासचिव:- सुरेश भिवगडे सहसचिव :- प्रविण अ. काळे. गौतम मेश्राम कोषाध्यक्ष :- पंकज भिमके सहक...

महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने "कपिल ठाकुर"सन्मानित

इमेज
महाराष्ट्र शासनाच्या गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने "कपिल ठाकुर"सन्मानित   अर्पित वाहाणे जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी वर्धा वर्धा (आर्वी ) :- मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक उत्कृष्ठ क्रीडा प्रशिक्षक म्हणून ठसा उमटविणारे कन्नमवार विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक कपिल ठाकूर यांना प्रजाकसत्ता दिनानिमित्य जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते सन्मानचिन्हसह रोख रकम देवून सन्मानित करण्यात आले.  कपील ठाकूर हे मागील ३० वर्षापासून कन्नमवार विद्यालय येथे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. कन्नमवार विद्यालय हि शाळा मागासलेल्या भागात असून त्या भागात असलेल्या नागरिकांना शिक्षण असो कि क्रीडा क्षेत्र यामध्ये कोणत्याही प्रकारची आवड नसतांना या भागातून शिक्षणातूनच नव्हे तर क्रीडा क्षेत्रात विद्यार्थी व विद्यार्थींनीनी या शाळेने घडविले. महत्वाचे म्हणजे प्रशिक्षक कपील ठाकूर यांनी आर्वी तालुक्यातील विविध वयोगटातील व्हॉलीबॉल खेळाडूंना मार्गदर्शन करून जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यामागे मोलाचा वाटा राहाला. प्रशिक्षक म्हणून...

शिव वझरकर यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्या-शिवसेनेची मागणी- उद्या शिवसेनेच्या वतीने शहरात कॅण्डल मार्च

इमेज
शिव वझरकर यांच्या हत्यारांना फाशीची शिक्षा द्या-शिवसेनेची मागणी- उद्या शिवसेनेच्या वतीने शहरात कॅण्डल मार्च चंद्रपूर: शिवसेनेचे युवा शहर प्रमुख शिवा भाऊ वझरकर यांचा 25 जानेवारी 2024 रोजी खून करण्यात आला. या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी उद्या चंद्रपूर शहरात कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना युवा सेना युवती सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या हत्येतील आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून हे सुटतातच कसे ? असा प्रश्नही शिवसैनिकांनी न्यायव्यवस्थेला विचारला आहे.

अवैध बांधकाम करणाऱ्यास अभय कोणाचे? ग्रामपंचायत नतमस्तक का? नागरिकांचा सवाल! प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्याची गरज! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी

इमेज
अवैध बांधकाम करणाऱ्यास अभय कोणाचे? ग्रामपंचायत नतमस्तक का? नागरिकांचा सवाल! प्रशासनाच्या वतीने गंभीर दखल घेण्याची गरज! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याची मागणी चंद्रपूर प्रतिनिधी मुल तालुक्यातील राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व सतत कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असणाऱ्या नांदगाव ग्रामपंचायतीत सध्या अनागोंदी कारभार सुरू असल्याचे अनेक पुरावे समोर येत आहेत. ग्रामपंचायत अधिनियमाच्या नियमांची पायमल्ली होत असताना सतत पहावयास मिळत आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार मालमत्ता धारकास ग्रामपंचायतीला जागा मालकीची कागदपत्रे, मंजूर लेआउट किंवा बांधकाम नकाशा, (मान्यता प्राप्त पदवीधारक अभियंता किंवा वस्तू रचना कारणे तयार केलेला) सादर करावा लागतो. राष्ट्रीयकृत बँकेत या बांधकामासाठीचे विकास शुल्क, कामगार उपकर भरलेले चलन आणि विहित नमुन्यातील वास्तू रचनाकार आणि स्थापत्य अभियंत्यांचे पत्र सादर करावे लागतात. या प्रक्रियेनंतर ग्रामविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक योग्य ती प्रशासकीय पूर्तता करून बांधकाम परवाना देऊ शकतात. मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून या ग्रामपंचायतीत अनागोंदीपणे कारभार सुरू आ...

प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवरांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छा

इमेज