उद्या शिवसेनेच्या वतीने शहरात कॅण्डल मार्च
चंद्रपूर: शिवसेनेचे युवा शहर प्रमुख शिवा भाऊ वझरकर यांचा 25 जानेवारी 2024 रोजी खून करण्यात आला. या खुनातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी उद्या चंद्रपूर शहरात कॅन्डल मार्च चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना युवा सेना युवती सेना महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या हत्येतील आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून हे सुटतातच कसे ? असा प्रश्नही शिवसैनिकांनी न्यायव्यवस्थेला विचारला आहे.
0 Comments