पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
दिवाळी सणासाठी तात्पुरत्या स्वरूपात साठवणूक व नियमाचे काटेकोर पालन करून परवानाधारकांना फटाके विक्री करता येते. मात्र नांदगाव आणि परिसरातील इतरत्र गाव खेड्यात मार्गदर्शक सूचनांचे कसलेही पालन न करता फटाके विक्री सुरू आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष केंद्रित करून संबंधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे. विस्फोटक नियम 2008 आणि 1884 नुसार फटाका विक्री परवाना दर्शनी भागावर लावणे आवश्यक आहे. परवाना मिळाल्या खेरीज फटाका विक्री करणे बेकायदेशीर आहे. विनापरवाना फटाके विक्री करणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे प्रावधान विफोटक नियमात तरतूद आहे. मात्र या सर्व नियमांची पायमल्ली करून ठोक व चिल्लर फटाका विक्रेत्यांनी नांदगाव बस स्थानक परिसरात मुख्य महामार्गावरच दुकान थाटलेले आहेत.
त्यांचेवर कठोर कारवाई करावी आणि नियमानुसार फटाके विक्री करण्यास बाध्य करावे अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
0 Comments