सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी
ब्रम्हपुरी :-
नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय ब्रम्हपुरी येथे ३१ऑक्टोबरला भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला. सरदार पटेल यांनी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेत मोठी भूमिका बजावली होती.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक जी.एन.रणदिवे होते. उपमुख्याध्यापक के.एम.नाईक, पर्यवेक्षक पि.व्ही.घोरुडे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
विद्यालयाचे मुख्याध्यापक रणदिवे यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना राष्ट्रीय एकता शपथ दिली.
यावेळी जी.एन.रणदिवे, नाईक सर, घोरुडेसर, बेंदेवार सर, वदनलवार सर यांनी भाषणात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावरती प्रकाश टाकेले व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला. तसेच स्व.ईंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य विनम्र आदरांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण मेश्राम सर यांनी केले व आभार प्रदर्शन मराठे मॅडम यांनी केले.
सदर कार्यक्रमाला नेवजाबाई हितकारिणी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व
शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments