Ticker

6/recent/ticker-posts

बिबट्याच्या हल्ल्यात बोर्डा झुलूरवार येथील एक शेतकरी व एक वन कर्मचारी गंभीर जखमी



पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
    पोंभूर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बोर्डा झुल्लूरवार शेत शिवारातील सर्वे नंबर 178  मध्ये शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने  शेतकऱ्यांवर हल्ला चढवून गंभीर जखमी केल्याची घटना दि. २७ आक्टोंबरला सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत वनविभागाला माहिती मिळताच वन अधिकारी व वनकर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन फटाके फोडून बिबट्याला पडवून लावण्याचा प्रयत्न केला.मात्र चवताळलेल्या बिबट्याने वनकर्मचाऱ्यावर हल्ला चढवून गंभीर जखमी केले असल्याने परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे.
      तालुक्यात वर्षभरापासून अनेक जीव आणि अनेक पशुधन वाघाच्या जबड्यात गेलेले आहेत. मात्र वनविभाग वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना व नागरिकांना संरक्षण देण्यास असमर्थ ठरत आहेत. असेच काहीसे चित्र तालुक्यात पहावयास मिळत आहे.
       या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव काशिनाथ गावडे वय वर्ष ५४ राहणार बोर्डा झुलूरवार न कर्मचारी मनोज गदेकर, देवाडा खुर्द असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ वन कर्मचारी व अधिकारी घटनास्थळावर दाखल होऊन जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वनपरिक्षेत्राधिकारी फनिंद्र गादेवार यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी व त्यांची टीम करीत आहे.

Post a Comment

0 Comments