Advertisement

लाईनमन दीपक पेंदाम यांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने आकस्मिक मृत्‍यु





लाईनमन दीपक पेंदाम यांचा विजेच्या धक्‍क्याने मृत्यू – मुख्यमंत्र्यांकडून तातडीची आर्थिक मदत

🕔 दिं. २२ ऑक्टोबर २०२२ | वेळ – संध्या. ६:३४
📍 दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | पोंभुर्णा तालुका, चंद्रपूर

पोंभुर्णा तालुक्यातील चेक हत्तीबोडी येथे महावितरणमध्ये कार्यरत वायरमन श्री. दीपक पेंदाम यांचा विद्युत दुरुस्ती दरम्यान विजेचा धक्का बसून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दुर्दैवाने, त्यांच्या मागे पत्नी व दोन लहान मुली (वय ३ वर्षे व १.५ वर्षे) असून दोघीही दिव्यांग आहेत. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची आहे.

या घटनेची गंभीर दखल घेत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून ₹५ लाखांची मदत देण्याची विनंती मुख्यमंत्री महोदयांना केली. ही मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मान्य केली आहे, अशी माहिती ना. मुनगंटीवार यांनी दिली.

ते म्हणाले की, “महावितरणच्या अधिकाऱ्यांनी अशा दुर्घटना पुन्हा होणार नाहीत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात,” असे निर्देशही त्यांनी दिले.

या दुःखद घटनेनंतर भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अल्का आत्राम, अजित मंगळगिरीवार, दर्शन गोरंटीवार, बंडू बुरांडे, वैभव पिंपळशेंडे, तसेच श्री. सातपुते यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने मदतकार्य व पुढील प्रक्रिया पार पाडली.



💡 लाईनमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू – कुटुंबासाठी ५ लाखांची मदत | दरारा 24 तास



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या