पोंभुर्णा प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जूनगाव येथे ज्ञानपीठ विचार मंच च्या वतीने 2022 17 मी आयएएस होणारच या स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला असून प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण कार्यक्रम दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा होमिकाताई मशाखेत्री होत्या.तर कार्यक्रमाचे उद्घाटन निपचंदजी शेरकी यांनी केले.मार्गदर्शक किशोर उरकुंडावार मुख्याध्यापक बोंडाळा बुज.सतीशजी शिंगाडे सर चेक आष्टा यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी स्थानी गावच्या प्रथम नागरिक पूनमताई चुधरी, उपसरपंच राहुल भाऊ पाल, देवरावजी आभारी उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, प्रफुलचंद चुधरी तंटामुक्ती अध्यक्ष, इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम विद्येची देवी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पाहुण्यांचे या कार्यक्रमात शाल आणि श्रीफळ देऊन सत्कारही करण्यात आला. शाळेतील विद्यार्थिनींनी स्वागत गीत सुरेल आवाजात गाऊन पाहुण्यांचे स्वागत केले.
या परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थी भार्गव कालेश्वर वार वर्ग आठवा, याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक मानसी चौधरी वर्ग सातवा, तन्वी मशाखेत्री वर्ग आठवा तृतीय क्रमांक या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे पाच हजार रुपये, 2000 व 1000 आणि प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बट्टे सर यांनी केले. सूत्रसंचालन कुमारी दिव्या ठुसे, कुमारी तनवी सुरकर, यांनी केले.कार्यक्रमाची सांगता आदर्श नागापूरे यांनी केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक पिंपळशेंडे सर आणि सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी, शिक्षक प्रेमी यांनी मोलाची सहकार्य केले.हा कार्यक्रम लोक सहभागातून करण्यात आला. हे येथे उल्लेखनीय.
0 टिप्पण्या
Thanks for reading