गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील शेतकरी गणपती सोनुले 1984 पासून वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून शेती करीत आहेत.
यावर्षी सुद्धा त्यांनी शेतात कापूस लावला पीक चांगले आले. पिकाला दीड लाखापर्यन्त खर्च झाले.अश्यातच दि.1.10.2022 रोजी धाबा येथील वनविभागाचे अधिकार्यांच्या आदेशाने वनरक्षक तसेच वन विभागाचे मजूर- कर्मचारी यांनी गणपती सोनुले यांच्या शेतीवर अक्षरशः हमला केला व कापसाचे रोपटे उपडू लागले.याआधी त्वरित जागा खाली करण्याचे आदेश फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी दिले होते परंतु शेतात पीक असल्याने ते खाली करू शकले नव्हते.मात्र वनविभागाच्या शेतपिकावरील हमल्याने विचलित होऊन यापुढे आपले व आपल्या कुटुंबाचे कसे होणार या धक्क्याने त्यांनी आत्महत्या सारखे पाऊल उचलले.आज दि.02.10.2022 रोजी त्यांनी विष प्राशन केले दैव बेहत्तर म्हणून ही बाब कुटुंबीय व शेजाऱ्यांच्या लक्षात आली.त्यांनी त्वरित सर्वांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे गणपती सोनुले यांना उप चारासाठी दाखल करण्यात आले..डॉक्टर व सहाय्यक यांनी मोठ्या शिताफीने त्यांच्या शरीरातील विष काढले व पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
0 Comments