तालुक्यातील आदिवासी बंधू, भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन
तालुका प्रतिनिधी
आदिवासी समाजाची अस्मिता, समाजाचं वैभव, समाजाचे दैवत म्हणून मान्यता पावलेल्या सम्राट राजा रावण यांच्या महापूजेचा कार्यक्रम विजयादशमी दिनानिमित्त पोंभुरना येथे भव्य स्वरूपात करण्याचे आयोजिले आहे.
रावणाची जशी प्रतिमा जण माणसात मांडण्यात आली ती वस्तुस्थिती नसून रावण हा दुष्ट कदापिही नव्हता, त्यांच्यासारखा राजा पृथ्वीवर होणे नाही. असे असताना महाविख्याता महापंडित असलेल्या या राजाला राक्षस करण्याचे षडयंत्र पोथी वाद्यांनी केले आहे. हे आता आदिवासी समाज ओळखायला लागलेला असून आपल्याच वंशजांना मारण्यासाठी आपण जातो ही भावना आता आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात जागृत झाली आहे. त्याचाच परिपाक म्हणून संपूर्ण देशात खेड्यापाड्यात रावण दहन करण्यावर बंदी घालण्यासाठी आदिवासी समाज वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून निवेदनात द्वारे मागणी उठवत आहे.
समाज हा समाज असतो समाजात अनेक संघटना, राजकीय पक्ष असे असतात यात कुठलेही दुमत नाही. परंतु समाजहितासाठी वेगवेगळ्या संघटनांचे पदाधिकारी, नेतेमंडळी एकत्रित येऊन आपल्या आदिवासी समाजाची अस्मिता जोपासण्यासाठी आपल्या शक्तीचे प्रदर्शन करावे. जेणेकरून शासक वर्गाला धसका बसेल.
आपल्या आदिवासी समाजात वेगवेगळ्या संघटना आणि वेगवेगळे नेते मंडळी आहेत. मात्र राजा रावण हा कोणत्या एका घटकासाठी नव्हता तो सर्व जनतेचा राजा होता, रयतेचा राजा होता. म्हणून त्यांच्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी सर्व मतभेद, सर्व संघटना बाजूला सारून आदिवासी केवळ या एकाच नावाखाली एकत्र होण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत तालुक्यातील गणमान्य आदिवासी कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
दिनांक पाच ऑक्टोबर 2022 रोजी विजयादशमी निमित्त शहरातून रॅली भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून ही मिरवणूक तिरू. अनिल टेकाम गोंडमहोला यांचे घरून निघेल. व संपूर्ण शहरात ही मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती बिरसा क्रांती दलाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
0 Comments