किरण निमगडे यांची घोसरीच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी अविरोध निवड


 ‌
     ‌ नांदगाव, विजय जाधव:

महात्मा गांधी गाव तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी पोंभुरना तालुक्यातील घोसरी ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या ग्रामसभेत तंटामुक्तीचे अध्यक्ष होण्यासाठी अनेक जण इच्छुक होते. परंतु विद्यमान ग्रामपंचायतचे उपसरपंच जितू चौधरी यांनी तंटामुक्तीचे अध्यक्ष अविरोध निवड झाली पाहिजे, असे ग्रामसभेत बोलून दाखवले त्यानुसार सरपंच, सचिव उपस्थित ग्रामसभा सदस्य यांनी जितु भाऊ चुधरी यांच्या पुढाकाराने तंटामुक्ती अध्यक्षाची निवड किरण निमगडे यांची ग्रामसभेत अविरोध करण्यात आली. ग्रामसभेला गावातील ग्रामसभा सदस्य सरपंच, सचिव उपसरपंच प्रामुख्याने हजर होते. रविभाऊ मरपल्लीवार माजी सरपंच सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष संचालक पोंभुर्णा तालुक्याचे जनसेवक यांनी माजी उपसरपंच किरण निमगडे यांची तंटामुक्ती अध्यक्ष पदावर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केलेले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू