छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन 'संविधान दिवस साजरा



पुरोगामी पत्रकार संघाचा आगळा वेगळा उपक्रम....

चंद्रपूर-छत्रपती शिवाजी महाराजांनी सुराज्य निर्माण करतांना जातीभेद केला नाही,सर्व जातीधर्माच्या लोकांना समानसंधी,समान वागणूक दिली.त्यामुळेच छत्रपती शिवराय महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनले...भारतीय संविधानही सर्व भारतीयांना समान संधी देतो.समता,स्वतंत्रता,बंधुता या मूलभूत तत्वावर आधारलेले भारतीय संविधान छत्रपती शिवरायांच्या सुराज्य निर्मितीची अघोषित घोषणा करतो... मात्र काही राजकारणी देशात हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.त्यामुळे छत्रपती शिवरायांचे कार्य कर्तृत्व मुस्लिम समुदायातील तळागाळात पोहचावे ही उदात्त भूमिका घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते भुरुभाई उर्फ नसीर बक्ष,ताजभाई अन्सारी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन २६ नोव्हेंबर 'भारतीय संविधान दिवस' साजरा करण्यात आला.
यावेळी पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,ते पन्नास दिवस या कादंबरी चे लेखक पवन भगत,पुरोगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुजय वाघमारे,राजू राठोड,नरेश पिंगे उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू