तालुका प्रतिनिधी,कृष्णा चव्हाण
जिवती :- तालुक्यातील राजीव गांधी महाविद्यालय पाटण येथे दि. 21 नोव्हेंबर ला ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
औरंगाबाद जिल्हातील पाटोदा ग्रामपंचायतीचे आदर्श सरपंच श्री. भास्कररावजी पेरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. शासकीय योजनाबद्दल आणि आदर्श गाव निर्माण कसे करावे या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला आदर्श सरपंच भास्कररावजी पेरे पाटील यांच्यासह चंद्रपूर चे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मुरूगानंथम एम (भा. प्र. से.) जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. रेजेवाड साहेब, जिवती नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष गजानन पाटील जुमनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुराचे सचिव अविनाशजी जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील व परिसरात ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य, गावपाटील, पोलीस पाटील, नाईक, कारभारी, अंगणवाडी सेविका, आशासेविका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व जनतेला मोठ्या संख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन आयोजन समितीचे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंगजी जाधव यांनी केले.
या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती आयोजन समितीने दिली आहे.
0 Comments