Ticker

6/recent/ticker-posts

सार्वजनिक कामात प्रशासकाने केला लाखोंचा भ्रष्टाचार 👉 प्रशासनाने सात दिवसात कारवाई करण्याचे दिले आश्वासन👉 भीम टायगर सेना करणार उपोषण


गडचिरोली / प्रतिनिधी. दि. 18/12/2022 :-

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा तालुक्यातील  सावंगी येथे  सन २०२०  ते  सुरू असलेल्या २०२२- २३  या आर्थिक  कालावधीत वादग्रस्त असलेल्या जातियवादी, भ्रष्टाचाराच्या बाबतीत नेहमीच वादग्रस्त असलेले आणि  भ्रष्टाचाराच्या विळख्यात    असलेले  प्रशासक  उमेश  चिलबुले यांनी अनेकविध कामात   गैरव्यवहार केला असुन  त्यांचेवर सबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी   योग्य चौकशी करून कारवाई करण्याची मागणी    भिम टायगर  सेनेच्या वतीने  दि 17/10/2022 रोजी जिल्हा परिषद  प्रशासनाला  निवेदन देऊन केली होती. जवळपास दोन महिने होऊनही कारवाई करण्यात आली नसल्याने भीम टायगर सेनेचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद यांची प्रत्यक्ष भेट घेतली.आणि चौकशी करून करून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. नाही तर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचेही याप्रसंगी निवेदनात नमूद केले. 
२०२०  ते सुरू असलेल्या २०२३ या आर्थिक वर्षातील  विविध  विकास योजना आणि अनेक प्रकारच्या ग्राम विकास योजना राबविण्याची जबाबदारी  प्रशासक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या  उमेश  चिलबुले या वादग्रस्ताकडे दिली होती. 
 सावंगी, गांधी नगर गटग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायत सावंगी  अंतर्गत  पिण्याच्या पाण्याची आर. ओ. मशीन, सार्वजनिक शौचालय,  जनहिताच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या  अंगणवाडी बांधकाम  , मृतदेह विसावा, या सारख्या अनेक कामात गैरव्यवहार केला असून  त्यांचेवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी  भिम टायगर सेना गडचिरोली च्या वतीने  करण्यात आली आहे. नालीवर कव्हर लावलेले नसतांना सुद्धा शासनाची दिशाभूल  करुन  लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे स्पष्ट  दिसत आहे. गांधीनगर  येथे झालेल्या  विविध बांधकामात प्रशासक उमेश चिलबुले  यांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केलेला आहे.  झालेल्या बांधकामाची  कोणत्याही प्रकारची माहिती आणि हिशोब  मांगु नये  म्हणून प्रशासक चिलबुले  यांनी  गावातील 5 - 10 दलाल लोकांना हाताशी घेऊन    " मी ग्रामसेवक संघटनेच्या  राज्य स्तरीय पदाधिकारी आहे. " माझे कोणीही काहीही वाकडे करू  शकत नाही, जिल्हा परिषदेचे सिओ, असोत की कलेक्टर असोत की बीडीओ राहो  माझे काहीच बिघडवू शकत नाही अशा अहंकारी भाषेत दमदाटी  करून दबाव टाकला जातो.  या बाबत प्रशासनाने सात दिवसात  योग्य चौकशी करावी अन्यथा भिम टायगर सेनेच्या वतीने  आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा मा. जिल्हा परिषद मुख्याधिकारी कुमार आशिर्वाद यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.  दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी भीम टायगर  सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  मुख्याधिकारी कुमार आशिर्वाद यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उमेश चिलबुले यांनी केलेल्या विविध प्रकारच्या भ्रष्टाचार प्रकरणी चौकशी का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर  सात दिवसात योग्य कारवाई करुन अहवाल देण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी  कुमार आशिर्वाद यांनी दिले. याप्रसंगी  भिम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम यांच्या नेतृत्वात  वडसा तालुकाध्यक्ष अंगराज शेंडे, महिपाल बन्सोड, सागर मेश्राम,  मिलिंद बावणे , अश्विन मेश्राम, मंगेश हनवते यांनी भेट दिली. दिनांक  23 /12 2022 पर्यत कारवाई करण्यात आली नाही तर  26/12/2022 पासून  उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती अंतराळ शेंडे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments