गडचिरोली/ चक्रधर मेश्राम दि. 06/12/2022:-
कटेझरी येथे क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हाध्यक्ष मनिराम दुगा याचे अध्यक्षतेखाली माजी आमदार हिरामनजी वरखडे यांचे हस्ते पार पडले .सदर उदघाटना प्रसंगी सरपंच गोपाल उईके, कोइंतुर शेतकरी उत्पादन कंपनीचे संचालक बारीकराव मडावी , रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर .गोंडवाना गणतंत्र पाटीऀचे युवा नेते प्रशांत मडावी , प्रभाकर सुरपाम , कवडू धंदरे , रामचंद्र काटेंगे, महाराज घनश्याम तोरे , शामराव तुमरेटी ,प्रतापशहा मडावी आदीच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण संपन्न झाले .
समाज प्रबोधन कार्यकमात माजी आमदार वरखडे म्हणाले की जल जंगल जमीन आमची आहे . तिचे रक्षण करणे महत्वाचे आहे. आदिवासीनी शेती कशी पिकवावी याचे तंत्र समजले पाहीजे तरच शेती करा अन्यंथा शेतामध्ये बाभुळ ,बांबु, सागवड आणि फळबाग पिकवून अधिक उत्पन्न करा यातच आपली उन्नती होइल व आपली संस्कृती आबाधित राहील . याप्रसंगी सरपंच गोपाल उईक, माजी ठाणेदार बाजीराव मडावी , प्रभाकर सुरपाम, प्रशांत मडावी धंदरे साहेब रिपाईचे मुनिश्वर बोरकर यांची गोडी धर्म व त्यांची संस्कृती यावर विचार प्रगट केले याप्रसंगी मनिराम दुगा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, शासनाच्या विविध योजना आहेत त्या ९० टक्के सुटीवर आहेत त्यामुळे आदिवासीं बांधवांनी बचत गट निर्माण करावा व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.
क्रांतीविर बिरसा मुंडा हे क्रांतीकारी होते त्यांनी इंग्रजाच्या विरोधात लढा दिला व आदिवासी बांधवाना न्याय मिळवून दिला अश्या बिरसा मुंडाचे खऱ्या अर्थाने आज अनावरण झाले यांचा आनंद वाटतो . कार्यक्रमाचे संचलन किसन उसेंडी यांनी तर आभार प्रनाबशहा मडावी यांनी मानले याप्रसंगी माजी आमदार हिरामणजी वरखडे यांचे हस्ते सत्कारमूर्ती घनश्याम तोरे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमास महेद्रा मडावी , पाहुरंग कुमरे, मनोहर ईस्टाम , प्रविण किरंगे , राजु मडावी प्रविण ईष्टाम', एकनाथ उईके सहित कटेझरी - चातगाव परिसरातील बहुसंख्य आदिवासी बांधव प्रामुखाने उपस्थित होते .
0 Comments