विजय जाधव, मुल तालुका प्रतिनिधी
पोभूर्णा तालुका हा भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात नगर नगरपंचायत तसेच पंचायत समिती, तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आहेत. येथील दोन्ही जिल्हा परिषद सदस्य हे सुद्धा भाजपाचे आहेत. एकंदरीत या तालुक्यात भाजपाचे वर्चस्व आहे. या तालुक्यातील काँग्रेसचा विचार केल्यास दोन गटात काँग्रेस दुभंगली असल्याचे दिसून येते. एकमेकांचे पाय धरून ओढण्यात काँग्रेस नेत्यांमध्ये चढाहोड सुरू असल्याचे आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकांमध्ये दिसून येत होते.
असे असताना अचानक वरिष्ठ काँग्रेस नेत्यांच्या आदेशामुळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माननीय सर्वांचे मामा कवडूजी कुंदावार यांना अचानक डुच्चू देऊन घोसरीचे युवा तडफदार माजी सरपंच तालुका उपाध्यक्ष सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अर्थात रवींद्र जी मर्पलीवार यांची काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. एका तरुण नेतृत्वाकडे तालुक्याचे सूत्र सोपविण्यात आल्याने काँग्रेसमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
या तालुक्यात दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सद्यस्थितीत नवनियुक्त तालुकाध्यक्ष काँग्रेसची सत्ता दोन्ही ग्रामपंचायतीवर प्रस्थापित करण्यासाठी व्यस्त दिसून येत आहेत. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे एकमेव लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या दौऱ्याचे नियोजन आखून व पूर्ण तालुक्यात विविध गावात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार महोदयासमवेत कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घडवून आणल्या. व आपल्या कर्तुत्व नेतृत्वाची एक झलक तालुक्यातील जनतेला दाखवून दिल्याचे दिसून येत आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात रवींद्र मर्पलीवार तालुकाध्यक्ष यांची कसोटी लागली असून दोन गटात विभागलेल्या काँग्रेसला एक संघ करून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत विजयश्री संपादित करून भाजपाचा बालेकिल्ला उध्वस्त करून या तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व कशा पद्धतीने प्रस्थापित करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून या तालुक्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजपा नेत्यांचे विशेष लक्ष केंद्रित झाले आहे. पालकमंत्री जूनगावात तर खासदार महोदय देव्हाळ्यात असा योग मागील पंधरवड्यात जुनगाव देवाळा वासीयांना दिसून आला. जुनगाव नदीवर मंजूर झालेल्या मोठ्या पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तसेच मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री क्षेत्राचे आमदार, विकासाचे महामेरू नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे हस्ते नदीवरील पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. तर याच आठवड्यात ग्रामीण जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी पोंभुर्णा तालुक्याचा नियोजनबद्ध दौरा करून नजीकच्या देवाडा बुज.गावात काँग्रेसचे लोकप्रिय खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी जनतेच्या भेटी घेऊन विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
एकंदरीत एकंदरीत रविभाऊ मरपल्लीवार यांच्या रूपाने तालुक्याला एक युवा नेतृत्व लाभल्याचा उत्साह काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. काँग्रेस मधली होत असलेली दुफळी तसेच भाजपाचे वर्चस्व कशा पद्धतीने नवनियुक्त तालुकाध्यक्ष रवी भाऊ मर्पलीवार कमी करतात आणि काँग्रेसला नव संजीवनी कशा पद्धतीने मिळवून देतात याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे.
0 Comments