Ticker

6/recent/ticker-posts

सावरगाव, वाढोणा परिसरातुन अवैध रेती वाहतूक जोमात, शासनाच्या करोडो च्या महसूल ला चुना! रात्रीच्या वेळी ट्रक्टर ने होते रेती तस्करी



अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी

नागभिड---तालुक्यात अवैध रेती तस्करी वाहतुकीने कहर केला असून महसूल व पोलीस प्रशासनाकडून आर्थिक गणित डोळयासमोर ठेवून सोयीस्कर पणे दुर्लक्ष केले जात असल्याने शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे.नागभिड तालुक्यातील सावरगाव,वाढोणा, येथील नदी पात्रातून व चिखलगाव घाटातील नदी पात्रातून दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळेस याच परिसरातील १० ते १२ ट्रक्टर ने राजरोसपणे रेतीची वाहतूक होत आहे. या परिसरात गोसीखुर्द खुर्द कालव्याचे व सिमेंट क्रांक्रिट रोडचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नदी पात्रातून मध्यभागी रेतीचे उत्खनन करून या परिसरात 6सुरू असलेल्या प्लंन्टवर अवैध मार्गाने टाकल्या जातात. तसेच ट्रक्टर धारक सुध्दा रात्री चोरट्या मार्गाने अप्पर तालुक्यातील गावागावात सुरू असलेल्या सिमेंट क्रांक्रिट रोडचे बांधकाम साठी रेती ची तस्करी केली जात असताना कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. तसेच मुख्य मार्गालगत अवैध रेती चे मोठे मोठे ठिगारे असताना प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याने शासनाला करोडो रूपयांचा चुना लागला जात आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या महसूल मंत्री साहेबांनी तालुक्यात होत असलेल्या अवैध रेती तस्करी करणाऱ्या वर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 
रेती माफियांना नेमके अभय कुणाचे अवैध रेती तस्करी करणाऱ्या वर कारवाई थंड बस्तयात आहे. प्रशासनाचा करोडो रूपयांचा महसूल बुडविला जात आहे. वाळूमाफियाना कारवाई ची भिती नाही. कुठल्याही महसूल अधिकारी वर्ग व पोलीस अधिकारी वर्गाचा वचक नसल्यामुळे दिवस रात्री रेती वाहतूक होत आहे. तसेच तस्करी करणाऱ्या रेती तस्कराकडून विना नंबर प्लेट चे ट्रक्टर ने वाहतूक होत असताना पोलीस विभाग गप्प बसला आहे. मुख्य मार्गावर वरून रेतीची वाहतूक होत असताना गस्त धारी पोलीस वर्ग कारवाई का करित नाही,त्यात संबंधीत राजकीय पक्षाचे कार्यकर्ता ॽ गुंतलेले आहेत, असे सामान्य नागरिक यांच्या कडून व्यक्त केली जाते.

Post a Comment

0 Comments