पोंभुर्णा: चंद्रपूर जिल्हा हा आदिवासी बहुल व ग्रामीण प्रमाण अधिक असलेला जिल्हा आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब नागरिकांना मोफत नेत्रचिकित्सा शिबिराच्या माध्यमातून डोळ्यांची तपासणी करता यावी याकरिता राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने श्री माता कन्या का सेवा संस्था चंद्रपूर यांच्यावतीने शिबिरांचे आयोजन करून रुग्णसेवेचे व्रत कायम जोपासत आहे.
तालुक्यातील आंबे धानोरा येथे आज 31 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 11 वाजेपासून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात तज्ञ मित्र चिकित्सकांकडून तपासणी करण्यात येणार आहे तरी अशा रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments