नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 6/1/2023:-
सध्याच्या काळात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहेत. अनेक महत्वाच्या कामांमध्ये याचा वापर अनिवार्य झाला आहे. याबरोबरच अनेक सरकारी योजनांचा लाभ देखिल याशिवाय घेता येणार नाही. मात्र आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केलेल्यांना शेवटचा इशारा देण्यात आला आहे. एका ताज्या एडवायझरीनुसार, जर आपले पॅन कार्ड 31 मार्च 2023 पर्यंत आधारशी लिंक केले नाही तर ते निष्क्रिय होईल. कारण या तारखेनंतर अशा लोकांना आपले पॅन कार्ड वापरता येणार नाही.
आयटी अॅक्टनुसार 31 मार्च 2023 पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नाही तर ते निष्क्रिय होईल. ज्यामुळे 1 एप्रिल 2023 पासून याचा वापर कोणत्याही कामासाठी करता येणार नाही. आसाम, जम्मू-काश्मीर, मेघालयातील जनतेला यातून सूट देण्यात आली आहे, याशिवाय 80 वर्षांवरील लोकांनाही यातून सूट देण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ३१ मार्च २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत दिली आहे. आपले पॅन- आधार लिंक आहे की नाही ते तपासावे .
सर्वात आधी आयकर विभागाच्या ई-फायलिंग वेबसाईटवर जावुन
पेजच्या डाव्या बाजूला ‘क्विक लिंक्स’चा पर्याय दिलेला असेल.
‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करुन पॅन, आधार क्रमांक आणि नाव प्रविष्ट करावे
ही माहिती दिल्यानंतर ओटीपी पाठवला जाते.
0 टिप्पण्या
Thanks for reading