चंद्रपूर: शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे राजुरा सस्ती मार्ग तातडीने निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालय चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाप्रमुख भूषण फुसे, राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे आणि गौरीच्या सरपंच आशा उरकुडे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
राजुरा सास्ती हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय धोकादायक ठरला असून जड वाहतुकीमुळे या भागात अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तातडीने रस्ता निर्माण व्हावा आणि येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना याच भागातील खानीत नोकऱ्या द्याव्या यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. जिल्हाभरातील शिवसैनिकांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.शिवसेनेचा आज रस्ता रोको: जिल्हाप्रमुखासह वंचित चे जिल्हाध्यक्ष करणार नेतृत्व
चंद्रपूर: शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांनी संयुक्तपणे राजुरा सस्ती मार्ग तातडीने निर्माण करावा, या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी आज दिनांक 11 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बल्लारपूर क्षेत्रीय मुख्य महाप्रबंधक कार्यालय चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिऱ्हे, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाप्रमुख भूषण फुसे, राजुरा विधानसभा समन्वयक बबन उरकुडे आणि गौरीच्या सरपंच आशा उरकुडे या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत.
राजुरा सास्ती हा मार्ग प्रवाशांसाठी अतिशय धोकादायक ठरला असून जड वाहतुकीमुळे या भागात अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तातडीने रस्ता निर्माण व्हावा आणि येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना याच भागातील खानीत नोकऱ्या द्याव्या यासह अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे. जिल्हाभरातील शिवसैनिकांनी या आंदोलनाला उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments