________________________________
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार सुनील केदार यांच्या हस्ते खरेदी विक्री सेवा संघ चामोर्संशस्थेचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी पणन संघाच्या वतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाने आपल्या कार्याची राज्यस्तरावर दखल दिली असून संघाने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला असून पुरस्कार देण्यात आलेला आहे.
जिल्हास्तरावर या संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त करून गडचिरोली जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. सदर दोन्ही पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष अतुल भाऊ गण्यारपवार यांना प्रदान करण्यात आले आहे.

राज्यस्तरीय तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे, पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांच्या हस्ते संस्थेचे अध्यक्ष अतुल गण्यारपवार व संस्थेचे प्रभारी सचिव राकेश पोरटे यांनी स्वीकारला.
0 Comments