विजय जाधव :विषेश प्रतिनिधी
पोंभुर्णा:नागपूर विभाग शिक्षक मतदार संघातून भरघोस मताने निवडून आलेले महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार सुधाकर गोविंदराव अडबाले (विधान परिषद सदस्य) यांचा जाहीर सत्कार समारंभ जनसेवा माध्यमिक विद्यालय दिघोरी येथे शनिवार दिनांक 4 - 3 - 2023 ला दुपारी बारा वाजता आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर - वनी - आर्णी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय भाऊ वडेट्टीवार, हे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष भाऊ धोटे, वरवडा विधानसभा क्षेत्राच्या आमदार सौ. प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजीत वंजारी विधान परिषद सदस्य नागपूर यांना प्राचार्य करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य सुधाकरराव अडबाले यांचा भव्य सत्कार करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जनसेवा ग्रामीण विकास संस्था नांदगाव चे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी उपाध्यक्ष काँग्रेस नेते विनोद भाऊ अहिरकर हे आहेत.
होणाऱ्या सत्कार समारंभास महाविकास आघाडीच्या सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रवी भाऊ मरपल्लीवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख आशिष कावटवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजय ढोंगे, व विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ तालुका पोम्भुर्णा,तसेच ग्रामीण विकास संस्था नांदगाव,यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 Comments