विजय जाधव:-पोभूर्णा तालुक्यातील चेकठाणा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच पुष्पाताई मारोती कूळमेथे यांनी चंद्रपूर येथे एका छोटेखानी कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री,वनमंत्री तथा मत्स्य उत्पादन मंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केला आहे.
सरपंच ह्या काँग्रेसच्या समर्थित उमेदवार म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु महाराष्ट्राचे झुंजार नेते, विकास पुरुष माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या विकास कार्यावर विश्वास ठेवून आणि गावातील रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी त्यांनी सुधीर भाऊंच्या उपस्थितीत चंद्रपूर येथे काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात प्रवेश केल्याची माहिती प.स. चे माजी सदस्य गंगाधर मळावी यांनी दिली आहे.
गंगाधर मडावी हे भाजपाचे कट्टर कार्यकर्ते असून चेक ठाणा येथील काँग्रेसचा गड त्यांनी उध्वस्त केला हे स्पष्ट या प्रवेशावरून दिसून येत आहे.
पोभुर्णा तालुका हा तसाही भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. तालुक्यात सुधीर भाऊंच्या नेतृत्वाने अनेक विकास कामे झाल्याचे दिसून येत आहे. याच विकास कार्याला भारावून काँग्रेसचे नेते पदाधिकारी यापुढेही भाजपात जाण्याच्या मानसिकतेत आहेत.
तालुक्यातील काँग्रेस ही दोन गटात विभागालेली दिसून येत असल्याने काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते संभ्रमात आहेत. काँग्रेसचा खरा गट कोणता याबाबत अनिश्चितता दिसून येत आहे.
नुकत्याच दिघोरी येथे नवनिर्वाचित आमदार सुधाकर जी अडबले यांच्या सत्कार कार्यक्रमात दुसऱ्या गटाची अनुपस्थिती दिसून आली. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष कवडूजी कुंदावार यांना विचारणा केली असता तो पक्षाचा कार्यक्रम नसल्याचे त्यांनी सांगितले.
एकंदरीत काँग्रेसमध्ये माजलेली दुफडी आणि दुसरीकडे एकसंघ भाजपा आणि त्यात प्रवेश घेणारे संभ्रमातील पदाधिकारी यामुळे एकंदरीत काँग्रेसची राजकीय दृष्ट्या नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे आणि यापुढे सुद्धा काँग्रेस आपले पदाधिकारी आपल्या पक्षात राखून ठेवण्यात यशस्वी होतील काय याकडे पूर्ण तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. कुळमेथे ताई यांच्या प्रवेशाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे,पंचायत समितीचे माजी उपसभापती विनोद भाऊ देशमुख, पंचायत समितीच्या माजी सभापती कुमारी अलकाताई आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य गंगाधर मडावी, ओम देव पाल यांची उपस्थिती होती. कुळमेथे यांच्या कार्यक्षेत्रात चेकठाना गंगापूर,टोक, ठाणे वासना ही चार गावे येत असून सद्यस्थितीत सरपंचाच्या भाजपा प्रवेशामुळे ही गावे भाजपामय झाल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रकारे काँग्रेसचे बालेकिल्ले ढासळत असतील तर आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी ही धोक्याची घंटा आहे असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
0 Comments