Ticker

6/recent/ticker-posts

धूम्रपानामुळे येतो बहिरेपणा.. काळजी घेणे महत्त्वाचे. 👉 जिल्हा शल्यचिकित्सक डॉ अनिल रुडे यांचा सल्ला



नागपूर /प्रतिनिधी दि. ७/३/२०२३:-
नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले होते. धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बहिरेपणा येण्याचा जास्त धोका असल्याचे अभ्यासाअंती सिद्ध झाले.
 धूम्रपानामुळे बहिरेपणा येतो हे स्पष्ट झाले आहे. 
धूम्रपान करणाऱ्या ३० मधून ११ व्यक्तींना श्रवणदोष आढळून आला होता. 
 धूम्रपानामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघाताचा धोका, तोंडाचा व फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्रपिंड निकामी होण्याची भीती, स्मृतिभ्रंश व अल्झायमर होण्याची शक्यता अधिक प्रमाणात असते. लता मंगेशकर हॉस्पिटलच्या ‘ईएनटी’ विभागाने केलेल्या एका अभ्यासात आणखी बहिरेपणा या आजाराची भर पडली आहे. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये भारताचा जगात चौथा क्रमांक लागतो. धूम्रपानामुळे डोक्यापासून ते पायापर्यंत सर्वत्र परिणाम भोगावे लागतात . सिगारेट व सिगारेटच्या धुरामध्ये ४,७०० हून अधिक घातक रासायनिक संयुगे असतात, जी सर्वाधिक विषारी असतात. धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत वारंवार धूम्रपान करणारी मध्यम वयाच्या व्यक्तीमध्ये मृत्यूची शक्यता अधिक असते. याच धूम्रपानावर लता मंगेशकर हॉस्पिटलच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाने एक अभ्यास केला. नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने हा कमी कालावधीचा ‘स्टडी’ होता. यात धूम्रपान करणाऱ्या व धूम्रपान न करणाऱ्यांमध्ये श्रवण दोषाच्या प्रमाणाचे शास्त्रीय मोजमाप करण्यात आले. धूम्रपान न करणाऱ्याच्या तुलनेत धूम्रपान करणाऱ्यांमध्ये बहिरेपणा येण्याचा जास्त धोका असल्याचे सिद्ध झाले.
  बहिरेपणाची समस्या नसलेल्या व ज्या आजारांमुळे बहिरेपणा येऊ शकेल अशा मधुमेह, क्षयरोग, उच्चरक्तदाब नसलेल्या अशा ६० व्यक्तींची निवड करण्यात आली होती या व्यक्ती २० ते ५० वयोगटातील होत्या. यातील ३० व्यक्ती धूम्रपान करणाऱ्या तर ३० व्यक्ती धूम्रपान न करणारी होत्या. यांची तपासणी केली असता धूम्रपान करणाऱ्या ३० मधून ११ व्यक्तींना तर धूम्रपान न करणाऱ्या तीन व्यक्तींना बहिरेपणा आढळून आला. रोज २० सिगारेट पिणाऱ्यांमध्ये बहिरेपणाचा धोका अधिक धूम्रपानामुळे बहिरेपणा आलेल्या ११ व्यक्तींमध्ये विडी किंवा सिगारेट पिण्याचे प्रमाण २० पेक्षा जास्त होते. यावरून लांब कालावधी पर्यंत व दिवसभरात जास्तीत जास्त विडी किंवा सिगारेट ओढणाऱ्यांमध्ये बहिरेपणाची शक्यता अधिक असते,  
यावरुन आणखी ‘स्टडी’करण्याची गरज नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे करण्यात आलेला हा ‘शॉर्ट टर्म स्टडी’ होता. परंतु यातून निघालेले निष्कर्ष हे धक्कादायक आहेत. धूम्रपानाच्या घातक परिणाम पाहता शासनस्तरावर यावर व्यापक ‘स्टडी’ होण्याची गरज आहे असे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी जागतिक श्रवण दिनानिमित्तआमच्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.

Post a Comment

0 Comments