अरुण रामुजी भोले
नागभिड तालुका प्रतिनिधी
नागभीड---- पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नागपूर मार्गांवरील कानपा शेत शिवारात काल रात्री 10 वाजता पोलीस विभागाचे वाहन क्रमांक एम एच 34बी व्ही 6075 हे कानपा जवळील आश्रम शाळेजवळील वळण घेत असताना मागील भर धाव अशोक लेलंड कंटेनर क्रमांक म
एम एच 40 वाय 1135 वाहनाने ओव्हवर टेक करण्याच्या नादात पोलीस वाहणाला धडक दिल्याची घटना रात्री दहाचे सुमारास घडली. यावेळी ठाणेदार घारे स्वतः गस्तीवर असल्याचे कळते. सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही पण वाहन क्षती ग्रस्त झाल्याचे कळते. कंटेनर वाहणाला पोलीस विभागाने ताब्यात घेऊन पुढील चौकशी ठाणेदार घारे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार सोनवणे, सह इतर पोलीस कर्मचारी करीत असून वृत्त लिहपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगण्यात आले असून वाहन चालक यास ताब्यात घेतले आहे. पुढील तपास सुरु आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading