चंद्रपूर: मुल तालुक्यातील राजोली येथील दारुड्या बापाने स्वतःच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे. मुलाची हत्या केल्यानंतर दारुड्या बापाने स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजोली येथील गणेश विठ्ठल चौधरी, वय 31 वर्ष हा आपल्या पत्नी काजल आणि मुलासह राहत होता. दरम्यान हनुमान जयंतीच्या दिवशी तो दारू पिऊन पत्नीला मारहाण केल्याने ती घरून निघून गेली होती. घरी स्वतः गणेश आणि तीन वर्षीय मुलगा प्रियांशु राहत होते. दरम्यान आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्याने दारूच्या नशेत मुलगा प्रियांशू याचा गळा दाबून खून केला आणि स्वतःच्या गळ्यावर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रियांशू गणेश चौधरी वय तीन वर्ष असते या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. घटनेची माहिती मुल पोलिसांना प्राप्त होताच घटनास्थळ गाठून पंचनामा केला. जखमी गणेश चौधरी याला उपचारार्थ मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
ब्युरो रिपोर्ट वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क चंद्रपूर
0 Comments