Ticker

6/recent/ticker-posts

भीषण अपघातात चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू, २५ जण जखमी




रायपूर: छत्तीसगडमधील बालोदा बाजार येथे भीषण रस्ते अपघात घडला आहे. येथे रायपूर-बलोदा बाजार राष्ट्रीय महामार्गावर एका ट्रकने पिकअपला जोरदार धडक दिली, ज्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात २०-२५ जण जखमीही झाले आहेत.

बालोदा बाजार येथील या अपघातात पाच महिला आणि एका चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील पलारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोदा पुलियाजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. पिकअपमधील लोक एका कार्यक्रमातून परतत असताना एका भरधाव ट्रकने पिकअपला धडक दिली. या अपघातात २० ते २५ जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृतांमध्ये ५ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश

अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलगा आणि पाच महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. यांनी नाव धनेश्वरी, प्रभा, धनेश्वरीची आई, घनश्याम, शांती आणि हेमा अशी सांगितली जात आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मृत हे तीन गावातील ६ लोक आहेत. घोडा पुल नावाच्या ठिकाणी हा अपघात झाला. पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पिकअपमधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले

अपघातानंतर पिकअपचा जो फोटो समोर आला आहे त्यावरुन अपघाताची तीव्रता कळते. यामध्ये वाहनाचा मागील भागाचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. इतर तिघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. पोलिसांना माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.

Post a Comment

0 Comments