Ticker

6/recent/ticker-posts

वैनगंगा नदी पार करून होते गाई बैलांची तस्करी, घोसरीच्या बैल बाजारात जनावरे कत्तलीसाठी सज्ज - संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष, बाजाराची चौकशी करण्याची मागणी




पोंभुर्णा: तालुक्यातील घोसरी आणि घाटकुळ येथे मोठा बैल बाजार भरतो. या बैल बाजार मध्ये गडचिरोली जिल्ह्यातून जुनगाव- लखमापूर बोरी येथील वैनगंगा नदीच्या पात्रातून आडमार्गाने गाई बैलांची तस्करी सुरू आहे. घाटकुळ आणि घोसरी येथील बैल बाजारात खाटकी मोठ्या प्रमाणात उतरत असून सकाळी दहा वाजता पासून जनावरांची रवानगी कत्तल खाण्याच्या दिशेने केली जाते. राजरोसपणे हा गोरख धंदा चालू असला तरी याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने अनेक जनावरांना कत्तलखान्यात आपला जीव द्यावा लागत आहे. संबंधित विभागाने या गंभीर बाबीची दखल घेऊन बाजारांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अनेक जनावरांचे जीव वाचवावे अशी मागणी शिवसेनेचे उप तालुकाप्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments