पुणे, 15 मे : खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या ९ मुली पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या 9 मुलींपैकी 7 जणींना वाचवण्यात यश आलं असून दोघी अद्याप बेपत्ता आहेत. स्थानिकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचवता आले.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गोऱ्हे-खुर्द गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुली बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.दोन पैकी एक मुलगी पाण्या बाहेर काढण्यात आली आहे. तर त्याआधी स्थानिकांच्या प्रसंगावधानामुळे सात मुलींना वाचविण्यात यश आलं. या घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.
0 Comments