एकाच कुटूंबातील चौघांची हत्या,! पत्नी, सासू, मेहुणीला मारल्याने शहर हादरले




दरारा 24 , (पिथौरागढ), १५ मे : उत्तराखंडमधील पिथौरागढ जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार महिलांची हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान ही हत्या याच कुटुंबातील एकाने केली आहे. संतोष नावाच्या मुलाने ही हत्या केली आहे. हत्येनंतर फरारी असलेला संतोष अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

त्याचा शोध घेण्यासाठी ड्रोनचीही मदत घेतली जात असून नेपाळला जाणाऱ्या सीमेवर विशेष पोलिसांचा पहारा आहे. 
       शांत जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिथौरागढ जिल्ह्यात एका तरुणाने पत्नी, सासू, चुलत वहिनी आणि चुलत बहिणीचा धारदार शस्त्राने गळा आवळून खून केल्याने भितीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान एकाच वेळी चार खून झाल्याने संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेमुळे पोलीसही चक्रावले आहेत. सामूहिक हत्येच्या कारणांचा तपास केला जात असून आरोपीचा शोध सुरू आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

नांदगावात एकाच रात्रीत नऊ दुकाने फोडली, व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

पिंपरी देशपांडे येथिल कापूस वेचणाऱ्या महिलेवर वाघाचा हल्ला

नांदगाव जवळ भीषण अपघात। कंपनीच्या सुपरवायझर चा जागीच मृत्यू