विजय जाधव: प्रतिनिधी
मुल- घराच्या स्लॅप वरून झोपेतून लघुशंकेसाठी पायऱ्यावरून उतरताना तोल गेल्याने खाली पडून मुल पोलीस ठाणे हद्दीतील नांदगाव येथील राजू नथुजी मोरे वय (३१) वर्षे,यांचा मृत्यू झाला. ही घटना मौजा नांदगाव येथे वार्ड क्रमांक १ मधील प्रतिष्ठित तरुण राजू मोरे यांना जखमी अवस्थेत मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही घटना मुल तालुक्यातील नांदगाव येथे आज दिनांक १४ मे रोजी रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.
राजू हा दिवसभर शेतात काम करून घरी आल्यानंतर रात्री जेवण करून स्लॅपवर झोपायला गेला.पायऱ्यावरून लघुशंकेसाठी खाली उतरताना तोल गेल्याने जमिनीवर पडला. लगेच त्याला मुल येथिल उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. राजूच्या आकस्मिक मृत्यूमुळे कुटुंब शोक सागरात बुडाले आहे. त्यांचे पश्चात एक लहान मुलगी, पत्नी,दोन विवाहित भाऊ व आई वडील असा बराच मोठा परिवार असून राजूच्या अचानक जाण्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
0 Comments