Advertisement

२६ मे रोजी पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत



तालुका प्रतिनिधी:- मूल व सावली तालुक्यातील रिक्त असणाऱ्या पोलीसपाटील पदांसाठी आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे दि.२६ मे रोजी आयोजीत केलेली आहे.
पोलीस पाटील पदासाठी आरक्षण सोडत काढून जिल्हाधिकाऱ्यांकडील पत्राद्वारे उपविभागीय स्तरावर रिक्त पोलीसपाटील संवर्गातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने संपूर्ण जिल्ह्यात एकाच वेळेस भरती प्रक्रिया राबविण्याबाबत सुधारित कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

मूल व सावली तालुक्यातील पोलीस पाटील पद रिक्त असलेल्या गावांसाठी पोलीसपाटील सरळसेवा भरती कामी शंभर बिंदुनामावली व प्रवर्गनिहाय लोकसंख्येच्या अनुषंगाने येणाऱ्या प्रवर्गनिहाय आरक्षणामधून ३० टक्के महिला आरक्षण सोडत दिनांक २६/०५/३०२३रोज शुक्रवार ला सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे आयोजीत केलेली आहे.
या गावांची सोडत निघणार आहे.

चेकघोसरी ,आकापूर,डोनाळा माल , पेठगाव निलसनी,सिर्सी चक, जिबगाव, सावंगी दिक्षीत, हरांबा, केळझर, किसाननगर,कोंडेखल, कोसंबी, चिरोली, पिपरीदिक्षीत , दाबगांव, भान्सी, बाबराळा, हिरापूर,जनकापूरतुकूम , कांतापेठ, केरोडा,भादुर्णा, उसरपार चक , उथळपेठ मारोडा, साखरी,थेरगाव,आसोलाचक , सोनापूर,चकदुगाळा,सायखेडा,आगडी, खानाबाद,चितेगांव,राजगड,पेठगाव माल विहीरगाव,सिर्सी माल,गेवरा खुर्द, काटवनचक,येरगांव,मानकापूर ,लोंढोली, हळदी,येजगांव,दहेगांव ,पारडी , भट्टीजांब, उसेगाव,केशरवाही,निमगाव, बारसागड, चक बेंबाळ,भानापूर गावातील जनतेला सुचित करण्यात येत आहे की, वरील गावातील पोलीस पाटील पदाची भरती करावयाची असल्याने पोलीस पाटील पदाचे आरक्षण संवर्ग निहाय निश्चित करण्याकरीता आरक्षण सोडत पध्दतीने किंवा जनगणना -२०११ च्या लोकसंख्येनुसार करावयाचे आहे. सदर आरक्षण सोडत दिनांक २६/०५/२०२३ रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय, मूल येथे आयोजीत केलेली आहे. तरी नविन पोलीस पाटील भरती – २०२३ आरक्षण सोडती करीता इच्छुकांनी उपस्थित राहावे व आरक्षण पदाबाबतची माहिती प्रत्यक्ष उपलब्ध करुन घ्यावी. असे ,
डॉ. रविंद्र होळी उपविभागीय दंडाधिकारी, यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुचीत केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या