पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील चेक आष्टा गावातील ग्रामपंचायतीची चपराशी पद भरती वादाच्या भोवऱ्यात अडकली असून गावकऱ्यांनी ही नियुक्ती रद्द करावी अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा संवर्ग विकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
ही पदभरती नियमनानुसार झाली नसल्यामुळे या पदभरतीत आर्थिक आणि हितसंबंध जोपासले गेले असा आरोप नागरिकांनी केला आहे. ही पदभरती रद्द करावी आणि नियमानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत वर्तुळात खळबळ उडाली आहे. संवर्ग विकास अधिकारी काय भूमिका घेतात याकडे गाव वाशियांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading