पोंभुर्णा:- तालुका प्रतिनिधी
कोणत्याही आपत्ती प्रसंगी स्वतःची सुरक्षा तसेच बचाव करताना आपत्तीत क्षतीग्रस्त झालेल्या इतरांना मदत करण्याचे धडे घेणे हे सगळ्यांसाठीच आवश्यक आहे.
पावसाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे अनेक गावे क्षतीग्रस्त होतात. वेळेवर उपस्थित होऊन छतीग्रस्तांना मदत व पुनर्वसन करण्यासाठी प्रशिक्षित जवानांची आवश्यकता आहे.
चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दल यांच्या वतीने मान्सूनपूर्व तयारीचा भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन व प्रतिसाद दलाच्या चमुला आज दिनांक 23 मे 2023 रोजी पूर परिस्थितीतील मदत व बचाव कार्य, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक बोट वैनगंगा नदीच्या खोल पाण्यात चालवून जवानांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणात पूर परिस्थितीत बचाव व शतिग्रस्तांना मदत करावयाची साधने, त्यांचा वापर, संकटात अडकलेल्या व्यक्तींना सोडवण्यासाठी वापरावयाच्या विविध उपाय योजना, त्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करणे, प्रथमोपचार करणे, जखमी नागरिकांची रुग्णालयापर्यंत सुखरूप ने आन करणे याबाबत सविस्तर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले.
https://youtu.be/lopLOCUAHXQ
https://youtu.be/lopLOCUAHXQ
या आपदा मित्र प्रशिक्षणाला प्रशिक्षक म्हणून सुरवाडे सर, मेश्राम सर उपस्थित होते.तर संजय चुधरी, अतुल झबाडे, युवराज नागपुरे सर्व राहणार जुनगाव,रुपेश वनकर, प्रतीक तेलसे, अंकुश घोंगडे, भुजंगराव बुरांडे, अरुण झबाडे हे आपदा मित्र उपस्थित होते. व त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.
0 टिप्पण्या
Thanks for reading