Ticker

6/recent/ticker-posts

भीषण अपघातात सात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू



गुवाहाटी:आसाममध्ये भीषण रस्ते अपघातामध्य ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसामची राजधानी गुवाहाटी येथील जलुकबारी परिसरात रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला. या अपघातामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला तर काही जण जखमी झालेत. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.


गुवाहाटीचे सह पोलीस आयुक्त ठुबे प्रतीक विजय कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, प्राथमिक तपासानुसार या अपघातामध्ये मृत्यू झालेले सर्वजण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. रविवारी रात्री जलुकबारी उड्डाणपुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात आसाम इंजिनिअरिंग कॉलेजच्या (AEC) सात विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.


इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी कारमधून प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या भरधाव कारने जळुकबारी उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. त्यानंतर ही कार डिव्हायडरला जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जण जखमी झाले.


या कारमधून इंजिनिअरिंगचे दहा विद्यार्थी प्रवास करत होते. अपघातामध्ये दहापैकी सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर इतर तिघे गंभीर जखमी झाले. जखमींवर गुवाहाटी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये (जीएमसीएच) उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात गुवाहाटी येथील अरिंदम भवाळ आणि निओर डेका, शिवसागर येथील कौशिक मोहन, नागाव येथील उपांगशु सरमाह, माजुली येथील राज किरण भुईया, दिब्रुगढ येथील इमोन बरुआ आणि मंगलदोई येथील कौशिक बरुआ या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
   
अपघातानंतर विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला होता.

साभारःवृत्त


Post a Comment

0 Comments