विजय जाधव: प्रतिनिधी, चंद्रपूर जिल्ह्यातील पोभुर्णा हा अति मागासलेला तालुका म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र राज्याचे हेवीवेट मंत्री तथा बल्लारपूर निर्वाचन क्षेत्राचे आमदार जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचा हा बालेकिल्ला म्हणून सुपरीचीत आहे. परंतु पोभूर्णा तालुक्यात राबविण्यात येणारे अनेक लघुउद्योग बंद पडल्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. या तालुक्यात बेरोजगारांची फौज निर्माण झालेली आहे.विविध मागण्यांसाठी येथील जनतेला मोर्चे, उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून नेहमीच संघर्ष करावा लागतो. राजकीय पुढारी व प्रशासनाच्या माध्यमातून आंदोलनची सांगता करून प्रशासनाकडून वेळ मारून नेल्या जात आहे.परंतु विविध प्रश्न अजूनही सुटल्याचे दिसून येत नाही.वेळवा, सेलूर इत्यादी गावातील लक्षवेधी मोर्चा हा मूर्तीमंत उदाहरण आहे. पीक नुकसान भरपाईच्या रकमा अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेल्या नाही. पुढील महिन्यात शेतकऱ्यांची पीक पूर्व हंगामाची वेळ येऊन ठेपलेली असताना अजूनही या तालुक्यात रोजची कामे सुरू करण्यात आली नाही. यामुळे रोजगारासाठी तालुक्यातील मजुरांना इतरत्र धावा धाव करावी लागत आहे. अशा स्थितीत शेतकरी व मजुरांची व्यथा जाणून जामतुकूमचे युवा धडाडीचे, कर्तबगार सरपंच भालचंद्र बोधलकर(तालुका अध्यक्ष सरपंच संघटना) यांनी रोहयोची कामे त्वरित सुरू करून मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केलेली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती मजुरांनीही केलेली आहे. x
0 Comments