नांदगाव ग्रामपंचायत मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी.
मुल तालुक्यातील ग्रामपंचायत नांदगाव येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयात नांदगावच्या प्रथम नागरिक कुमारी हिमानी ताई वाकुडकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सहारे साहेब ग्रामपंचायत मधील कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते. यावेळी सरपंच महोदयांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
तसेच गाव विकासासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी सरपंच व ग्रामपंचायत ग्रामसेवक यांच्या वतीने गावातील दोन कर्तबगार महिलांना शाल श्रीफळ व ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. या स्तुत्य उपक्रमाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवकांचे आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा