Ticker

6/recent/ticker-posts

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, वनविभागा प्रति गावकऱ्यांत संताप



    सावली तालुका प्रतिनिधी
वाघाच्या हल्ल्यांचे प्रमाण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र वाढलेले असले तरी वनविभागाला त्याचे काहीही सोयर सुतक नसल्याचे जाणवत आहे.
       तालुक्यातील वाघोली बुटी येथील एका 55 वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. ही घटना शनिवारी 20 मे 2023 रोजी सकाळच्या सुमारास घडली. प्रेमीला मुखरू रोहनकर वय 55 वर्षे असे मृतक महिलेचे नाव आहे.
     मिळालेल्या माहितीनुसार मृतक प्रेमीला रोहनकर ही महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर अचानक हल्ला करून जागीच ठार केले.
      या घटनेची माहिती गावात पसरतात गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी वाघाचा बंदोबस्त केल्याशिवाय मृतदेह हलवणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Post a Comment

0 Comments