Ticker

6/recent/ticker-posts

सुरजागड लोह प्रकल्पाच्या वाहतुकीने पुन्हा घेतला एका शिक्षकाचा बळी




गडचिरोली: जिल्हा प्रतिनिधी
    सुरजागड लोह प्रकल्प अनेकांच्या जीवावर ऊठला असून लोहखनिज भरुण जाणाऱ्या- येणाऱ्या ट्रकांमुळे अनेक अपघात घडत असून अनेकांचे जीव गेले आहेत.
     आष्टी येथील चौकात तेरा वर्षीय मुलीला चिरडल्याची घटना ताजी असतानाच आलापल्ली चौकात ही दुसरी घटना आठवड्याभरातच घडून आल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.
     या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकाचे नाव वासुदेव कुळमेथे असे असून ते भगवंतराव प्राथमिक आश्रम शाळा काटेपल्ली येथे कर्तव्यावर होते. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजता चे सुमारास घडली. सदर अपघात करणारा ट्रक महालक्ष्मी ट्रान्सपोर्ट आलापल्ली यांच्या मालकीचा असल्याचे समजते.

Post a Comment

0 Comments