मूल प्रतिनिधी
मूल पोलिस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नलेश्र्वर येथील गायमुख देवस्थान जवळील गाव तलावात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली.
मृत तरुण नेहमी प्रमाणे बैल धुण्यासाठी गेला असता तोल गेल्याने खोल खड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आकाश लक्ष्मण कुमरे वय 24 वर्ष असे बुडून मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे.हा युवक नलेश्वर गायमुख जवळील गाव तलावात सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास बैल धुण्यासाठी गेला असता खोल पाण्यात जाऊन पाय घसरल्या मुळे त्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ होत असून त्याचे पश्चात आई आणि दोन भाऊ व एक बहिण असा आप्त परिवार आहे.
0 Comments