Ticker

6/recent/ticker-posts

वनमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रात वनविभागाचा मनमानी कारभार- घोसरी वनक्षेत्रात वाघाची दहशत; नागरिक हैराण



*पोंभूर्णा | रुपेश निमसरकार*
महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रात घोसरी वन परिसरात मागील दिवसात एका वाघीनीचा शेतकऱ्याच्या शेतात विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर गोवर्धन, जुनगाव, देवाडा बुज, बोडाळा, नांदगाव परिसरात वाघ फिरत असल्याचे प्रत्यक्ष नागरिकांच्या पाहण्यावरुन कळते. या परिसरात वाघ फिरत असल्याची बाब अनेक शेतकरी नागरिक वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना वारंवार कळवित आहेत. मात्र वनविभाग शेतशिवारातून वा रस्त्यावरून या फिरत असलेल्या वाघाचा बंदोबस्त करण्यात हलगर्जीपणा करीत असून कोणतीही उपाययोजना करीत नसल्याने वनविभागाच्या मनमानी कारभारामुळे कंटाळून वनमंत्री मुनगंटीवार यांच्या विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. व वनमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रातच वनविभागाचा मनमानी कारभार चालल्याची बोचरी टिका नागरिक  करीत आहेत. व वाघाच्या दहशतीखाली दैनंदिन जिवन जगत आहेत.
वनमंत्री मुनगंटीवार यांच्या विधानसभा क्षेत्रातील पोंभूर्णा तालुक्यातील घोसरी वन परिसरात वाघ कधी शेतशिवारात तर कधी गावाशेजारी आपली फेरी घालत आहे. कधी सकाळी तर कधी दुपारीच वा सांयकाळी नागरिकांना दर्शन देत आहे. त्यामुळे सद्या पावसाळा पुर्व हंगामाला सुरवात झाली असल्याने शेतकरी शेतात ये-जा करीत आहेत. रस्त्यावरून सुद्धा नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात. मात्र अशा वाघाच्या फिरण्याने शेतकरी, नागरिक भयभीत झाले आहेत. वाघाच्या दहशतीने शेती हंगाम करण्यास शेतकरी वर्ग सरसावत नसल्याने शेती हंगाम मागे पडण आहे. या गंभीर बाबीची माहिती वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार देऊन सुद्धा वनविभाग कडून काहीच उपाययोजना होत नसल्याने वनमंत्री मुनगंटीवार यांच्या वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी वाघासारखीच दहशत निर्माण करतांना दिसत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार वनविभागाच्या अधिकाऱ्यांची वेळीच कान उघडनी करुन तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी वृत्तपत्राच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांनी वनमंत्री मुनगंटीवार यांना केली जात आहे.

*बॉक्स मध्ये हायलाईट👇*
*वनमंत्र्याच्या पक्ष पदाधिकाऱ्यांनीच दिली आंदोलनाची चेतावणी*
भाजपा पक्षाचे सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वनमंत्री व जिल्हाचे पालकमंत्री आहेत. असे असतांना वनमंत्र्याच्याच विधानसभा क्षेत्रात वनविभाग असा हलगर्जीपणा करीत मनमानी कारभार करीत असल्याने भाजपाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल पाल यांनी वनमंत्र्याच्या वनविभागा विरोधात वाघाच्या दहशतीत असणाऱ्या नागरिक, शेतकरी यांना न्याय मिळावा म्हणून वनमंत्र्याच्या वनविभागाला आव्हान देत आंदोलनाची चेतावणी दिली आहे.

Post a Comment

0 Comments