रंजन मिश्रा: लग्न आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा सोहळा त्यामुळेच लग्न बघावे करून असे बोलल्या जाते. आयुष्यात एकदाच होणारे लग्न अविस्मरणीय व्हावे ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि आपल्या मुलीची पाठवणी करताना आपल्या आयुष्यातील सर्व काही पणाला लाऊन वर पक्षांकडील मंडळींची व्यवस्था करतो.
त्याचप्रमाणे आपले लग्न जगावेगळे व्हावे असे प्रत्येक नवरदेवाला वाटत असते. त्यामुळे लग्नाची वरात जास्तीत जास्त आकर्षक असावी, लग्नात मित्र परिवाराने मनमुराद आनंद लुटावा ह्यासाठी महागडे बँड, डी जे, लावुन कुणी महागड्या गाड्या सजवून तर कुणी आकर्षक पांढऱ्या घोड्यावरून वरात घेऊन जातात.
मात्र भद्रावती तालुक्यातील आष्टा येथिल एम. ए. बी. एड्. असलेला कृषी केंद्र संचालक नवरदेव "अमोल संतोषराव पडवे" ह्याचे लग्न यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथिल जया देवरावजी वैद्य हिच्याशी ठरल्यानंतर विवाह सोहळा आपल्या गावातच करण्याचा निर्णय घेतला. आपले लग्न अविस्मरणीय व्हावे असे स्वप्न बघणाऱ्या अमोलने आपल्या लग्नाची वरात जगावेगळ्या पद्धतीने काढण्याचे ठरवून वरातीसाठी चक्क उंट मागवला व उंटावर बसुन थेट लग्न मंडपात पोहचला.
0 Comments