Ticker

6/recent/ticker-posts

घोसरीच्या बैल बाजारातील जनावरे तेलंगानातील कत्तलखान्यात! बाजार समिती नफ्यात तर बळी राजा गोत्यात, गोरक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज

 

घोसरीच्या बैल बाजारातील जनावरे तेलंगानातील कत्तलखान्यात!


बाजार समिती नफ्यात तर बळी राजा गोत्यात, गोरक्षक संघटनांनी लक्ष देण्याची गरज

          पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील बैल बाजार चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वात मोठा बैल बाजार म्हणून सुपरिचित आहे. चंद्रपूर सह गडचिरोली जिल्ह्यातील वडसा ,आरमोरी आणि मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातून सुद्धा दलालांच्या मार्फतीने, वाहनांच्या साह्याने जनावरांची घोसरीच्या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून परिसरातील शेतकऱ्यांची व दलालांची आणि कसायांची या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री सुरू आहे. मध्यस्थी मनविले जाणारे दलाल, व्यापारी व कसाई यांनी शेतकऱ्यांचे बैल स्वस्त दरात खरेदी करून अवैधरीत्या खुलेआम आळमार्गाने दिवसभरात मजुरांच्या मार्फतीने बैल एकत्र गोळा करून रात्रीच्या सुमारास वाहनाद्वारे महाराष्ट्राच्या शेजारील तेलंगणा ,आंध्र प्रदेश या राज्यात कत्तलीसाठी घेऊन जाण्यात कसाही यशस्वी होत आहेत. 

      कसाई व दलालांचा हा गोरख धंदा गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने सुरू असल्याचे कळते. बैल बाजार भरविणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे व पोलीस विभागाचे या गोरख धंद्याकडे लक्ष नाही काय?अशा चर्चेला उधाण आलेले आहे.पोंभुर्णा तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या घोसरी येथील बैल बाजार दर शुक्रवारला भरविण्यात येतो. या बाजारात येणारे संपूर्ण खाटकी मजुरांच्या नावावर किंवा जवळच्या व्यक्तींच्या नावाने बैलांच्या विक्रीची पावती बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांकडून तयार करून या बाजारातून शेकडो बैल जोड्या तेलंगणा राज्यात दलालांच्या मार्फततिने कसायांच्या घशात जात आहेत.

      व्यापारी दलाल व बाजार समितीचे कर्मचारी यांच्यात मिली भगत असल्याने शेतकऱ्यांची मोठी गळचेपी झाल्याचे दिसून येत आहे.

सदर बैल बाजार शेतकऱ्यांच्या बैलांच्या खरेदी विक्रीसाठी आहे की, कसाई व दलालांसाठी आहे असा प्रश्न निर्माण झालेला आहे. गोरक्षक संघटनाने या गोरख धंद्याकडे लक्ष देऊन कत्तलखान्यात जाणाऱ्या जनावरांना वाचवण्याची मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांची गळचेपी थांबावी व बाजार समितीने आपली पारदर्शकता दाखवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

Post a Comment

0 Comments