तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा: तालुक्यातील जुनगाव देवाडा बुज बोंडाळा बीज. बोंडाळा खुर्द, नांदगाव गोवर्धन इत्यादी गावातील शेतशिवारात अनेक दिवसांपासून नव्हे महिन्यांपासून वाघाची दहशत पसरली आहे. दररोज कुठे ना कुठे वाघाचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे.
सुदैवाची बाब म्हणजे आतापर्यंत मोठी जीवित हानी झाली नसली तरी मोठी जीवित हानी भविष्यात होण्याची दाट शक्यता आहे. शेतकऱ्यांची शेतीचे हंगाम सुरू झाले असून शेतकरी शेतामध्ये जाण्यासाठी धजावत नसल्यामुळे शेती पडीक राहण्याची वेळ आली आहे.
दररोज वाघांचे दर्शन होत असताना वनविभाग कुंभकर्णी झोपेत आहे. त्यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर शंका उपस्थित होत आहे. मनुष्यहानी आतापर्यंत झाली नसली तरी शेतकऱ्यांच्या जनावरांना वाघाच्या हल्ल्यात बळी ठरावे लागले आहे. त्यामुळे वेळीच वन विभागाने वाघांचा बंदोबस्त करून जेरबंद करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
0 Comments