पोभुर्णा : तालुक्यातील मोहाळा येथील एक प्रतिष्ठित शेतकरी अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबीयांत चिंतेचा सावट पसरले होते. ते बेपत्ता झाल्यापासूनच त्यांच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली प्रसारमाध्यमातून सुद्धा वृत्त प्रकाशित करून शोध लावण्याचे आवाहन केले होते. मात्र त्यांचा कुठेही शोध लागला नव्हता.
घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आल्याने पोलीसही संबंधित शेतकऱ्याच्या तपासात होते. मात्र दहाव्या दिवशी मोहाळा गावानजी कसलेल्या नदीत त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले. या शेतकऱ्याचा मृत्यू कसा झाला. हत्या की आत्महत्या? याचा तपास पोलीस करीत आहेत.
0 Comments